MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली चूक आदित्य भरून काढताना दिसत आहेत.

राजकारण हा महत्वकांक्षाचा खेळ आहे म्हणतात. ज्याच्या जास्त मोठ्या महत्वकांक्षाच्या तेवढा तो मोठा होतो. १९८४ ला दोन जागेवर निवडून आलेल्या भाजपने कधीही राष्ट्रीय राजकारणातली महत्वकांक्षा कमी केली नाही. त्यांचं फळ त्यांना भेटंल देखील. २७२ जागा जिंकून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा देशात एक नंबरला गेला.

आमचं चुकलं असं उद्धव ठाकरेंनी कबुल केलंय

२०२१ च्या दसरा मेळाव्याच्या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपाला चांगलेच टोले लगावले. याच कारण पण आपल्याला माहिती आहे. अनेक वर्ष दोस्त असलेले भाजप आणि शिवसेना एकमेकांचे कट्टर विरोधक झाले आहे आहेत. शिवसेनेवर टीका करताना भाजपचे नेते एकही संधी सोडत नाहीत. विशेष म्हणजे दसऱ्याच्या आधी भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या थरावर जाऊन टीका केली. भाजपचे लोक शिवसेना आमच्या जीवावर निवडून आली म्हणून बोलत असतात. ह्या सगळ्यांना उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले. उद्धव म्हणाले , ज्या वेळेस बाबरी पडली तेंव्हा बाळासाहेब ठाकरेंची लाट होती. त्यावेळी जर आम्ही उतररप्रदेश आणि इतर राज्यात स्वतःला वाढवलं असत तर भाजपाला लोकांनी स्वीकारलेच नसतं . आम्ही पुढाकार घेतला नाही त्यामुळेच भाजप देशात वाढू शकली नाही. आमही भाजपाला देशभर वाढण्याची संधी दिली ही आमची चूक झाली.

शिवसेनाच नवा चेहरा आदित्य राष्ट्रीय राजकारणात स्पेस शोधतोय.

महारष्ट्र एक महारष्ट्र हाच शिवसेनेचा आज पर्यंतचा प्रवास राहिला आहे. मराठी माणसांसाठी शिवसेनेने सर्वाना अंगावर घेतले. साहजिकच शिवसेना महाराष्ट्राच्या बाहेर वाढली नाही. शिवसेना इतर राज्यात वाढावी अशी बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पण नव्हती. आपण बरे अन आपला महाराष्ट्र बरा हे त्यांचं मत. बाळ ठाकरे यांच्या काळात ते जमलं पण आता राज्यात मजबूत राहायचं असेल तर राष्ट्रीय पातळीवर अस्तिव असावे लागते. शिवसेनेसाठी हे ओळखलं आदित्य ठाकरेंनी.

राष्ट्रीय पातळीवर शिवसेना असायला पाहिजे असं आदित्यच मत होत. तो राजकारणात आल्यापासूनच त्यासाठी मेहनत घेत होता. आदित्य यांच्या आग्रहामुळे शिवसेना इतर राज्यांमध्ये निवडणूक लढवायला लागली. २०११७ शिवसेने उत्तरप्रदेशात निवडणूक लढवली. २०२२ च्या निवडणुकीत देखील शिवसेनेने ५९ उमेदवार उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत उभे केले आहेत. मागच्या वेळा प्रमाणे याही वर्षी पण शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉजिट जप्त होतील अस भाजपचे नेते म्हणत आहेत. पण आदित्य याना शिवसेनेला फायदा होईल असं वाटतंय.

आक्रमक ओळख असलेल्या शिवसेनेला आदित्य ठाकरेंनी नवी ओळख दिली आहे. आदित्य यांचं राजकारण काँग्रेस आणि इतर पक्षाप्रमाणे सर्वाना सामावून घेणारं वाटत आहे. राष्ट्रीय राजकारणात दाखल पात्र होण्यासाठी शिवसेनेला खूप मेहनत घावी लागेल पण आदित्य शिवसेनेची स्पेस शोधत आहेत. संधी असताना राष्ट्रीय राजकारणात न जाण्याची चूक बाळासाहेब ठाकरेंनी केली पण आता संधीची वाट न पाहता आदित्य ठाकरे पक्ष राष्ट्रीय पातळीवर वाढवून चूक सुधारत आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.