MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

मुख्यमंत्री झालो तर ठीक नाही तर कपिल शर्माचा शो जिंदाबाद

Sidhhu continue kapil sharma show

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० फेब्रुवारी ला मतदान होईल तर १४ मार्चला निकाल येतील. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसची लढाई आम आदमी पक्षाशी आहे. पण काँग्रेस पक्षामध्ये गृहयुद्ध चालू आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सिद्धू आणि मुख्यमंत्री चरंजीत सिंग चन्नी यांच्यात बेबनाव असल्याच्या बातम्या येत आहेत.

काँग्रेसचे धक्कातंत्र चन्नीला मुख्यमंत्री केले.

तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना हटवण्यासाठी नवजोत सिंग सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांच्याशी भांडण केले. अमरिंदर यांच्या विरोधात वातावरण बनवलं. अमरिंदर यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी नवजोत सिंग सिद्धू यांनी सगळी ताकत लावली. निवडणुकीच्या चार पाच महिने आधी सिद्धू यांच्या मेहनतीला फळ मिळाले. काँग्रेस नेतृत्वाने अमरिंदर सिंग याना मुख्यमंत्री पदावरून हटवले. साहजिकच अमरिंदर याना हटवल्यामुळे नवजोत सिंग सिद्धू मुख्यमंत्री होतील अश्या चर्चा होत्या. पण काँग्रेस नेतृत्वाने सगळ्यांना धक्का दिला. अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले चरंजीत सिंग चन्नी याना मुख्यमंत्री केलं. चरंजीत सिंग यांच्या रूपाने काँग्रेसने पंजाबला पहिला दलित मुख्यमंत्री दिला. पंजाबमध्ये ४०% दलित असल्यामुळे दलित मतदार काँग्रेसकडे येण्याची शक्यता वाढली आहे. पंजाबचा दलित मतदार पारंपरिक बीएसपीचा मतदार आहे. चन्नीला मुख्यमंत्री करून काँग्रेसने मास्टरस्ट्रोक मारला आहे. पण ह्या सगळ्यात नवजोत सिंग सिद्धू नाराज झाले आहेत. मुख्यमंत्री न केल्यामुळे नवजोत सिद्धू यांनी प्रदेश काँग्रेस पदाचा राजीनामा दिला होता.

प्रचार सोडून सिद्धू वैष्णोदेवी देवीच्या दर्शनाला.

मुख्यमंत्री पद नाकारल्यावर सिद्धू यांना काँग्रेस नेतृत्वाने समजावून सांगितले. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा सिद्धूने त्यामुळे परत घेतला. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी सिद्धू यांचा विचार केला जाईल असा त्यांना शब्द दिला आहे. पण सगळा प्लॅन बिघडला २७ जानेवारीला अमृतसर मध्ये राहुल गांधी यांची सभा झाली. सभेत राहुल गांधी यांनी काँग्रेस मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करणार असल्याचे जाहिर केले. आता राहुल गांधी यांनी स्वतः घोषणा केल्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार हे निवडणुकीच्या आधीच जाहीर होणार आहे. सिद्धूची समस्या झाली आहे कारण सध्या असलेले मुख्यमंत्री चन्नी यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याशिवाय काँग्रेसकडे पर्याय राहिला नाही. चन्नीला मुख्यमंत्री पद नाकारल्यावर त्याचा परिणाम निवडणूक निकालावर होऊ शकतो. ४० % असलेले दलित मतदार काँग्रेसपासून दूर जाऊ शकतात. चरंजीत सिंग चन्नीच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे साहजिकच सिद्धूचा पत्ता कट झाला आहे. १ फेब्रुवारीच्या सायंकाळी ७ वाजता काँग्रेस मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणार होते. त्यामुळेच त्याच दिवशी सिद्धू प्रचार सोडून वैष्णोदेवी देवीचे दर्शन घेण्यासाठी गेले आहेत.

मुख्यमंत्री पद भेटत नसेल तर आम्ही आमच्या व्यवसायात परतणार.

प्रचार सोडून सिद्धू वैष्णोदेवी देवीच्या दर्शन घेण्यासाठी गेल्यामुळे पंजाबमध्ये वेगवेगळ्या चर्चांचे पेव फुटले आहेत. नवजोत सिद्धू यांच्या आमदार पत्नी नवजोत कौर यांना सिद्धू यांच्या वैष्णोदेवी दौऱ्याबद्दल विचारल्यावर त्यांनी मोठे खुलासे केले आहेत. “नवजोत कौर म्हणतात कॅप्टन विरोधात लढाई लढली नवजोत सिद्धूने पण काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री केले नाही. त्यामुळे जर सिद्धूला मुख्यमंत्री करणार नसतील तर राजकारणात राहण्यात काही अर्थ वाटत नाही. स्वतः मला माझ्या डॉक्टरीमध्ये महिन्याला २० लाख रुपये भेटतात तर नवजोत सिंग सिद्धू यांना प्रत्येक महिन्याचे ८० लाख रुपये मिळतात. त्यामुळे जर सिद्धूला मुख्यमंत्री नाही बनवले तर आम्ही दोघेही आमच्या व्यवसायात परतणार आहोत.”

नवजोत कौर यांच्या खुलाश्यांवरून तर हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने जर सिद्धूला मुख्यमंत्री केले नाही तर ते परत त्यांच्या जुन्या व्यवसायात परतणार आहेत. म्हणजेच सिद्धू परत कपिल शर्माच्या शो मध्ये शायरी करताना दिसतील.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.