खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ही वैश्विक कविता लिहणारे महाराष्ट्राचे लाडके साने गुरुजींची आज (२४ डिसेंबर) १२२ वी जयंती आहे. साहित्यिक, कवी, स्वातंत्र्य सेनानी आणि आयुष्यभर सगळ्यांवर प्रेम करणारे साने गुरुजी हीच खरी साने गुरुजींची ओळख. प्रेम करणारे, प्रेम शिकवणारे साने गुरुजी समाजातील वाईट घटनांमुळे नेहमीच व्यथित व्हायचे. एका घटनेने तर गुरुजींना हतबल झाल्यासारखे वाटले. महात्मा गांधींच्या हत्येनंतर साने गुरुजी प्रचंड निराश झाले होते. आपण महाराष्ट्राचे आहोत या बद्दल लाज वाटत असल्याचं गुरुजी बोलले होते. ही घटना आहे जानेवारी १९४८ ची.
साने गुरुजींचं व्यक्तिमत्व कसं होतं?
पालगड नावाच्या छोट्याश्या गावात जन्मलेले पांडुरंग सदाशिव माने आपल्या कामाने सर्वांचे लाडके साने गुरुजी झाले. ‘श्यामची आई’ सारखं पुस्तक लिहून तर साने गुरुजींनी जगाला भारतीय संस्कृती आणि हळव्या मनाचे दर्शन दिले. थोर साहित्यिक असलेल्या साने गुरुजींनी आपले पूर्ण आयुष्य महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीत घालवले. साने गुरुजी महात्मा गांधींचे निस्सीम भक्त होते. गांधींचे विचार देशभर जावे यासाठी साने गुरुजी काम करत. गांधींनी सांगितलेला अहिंसेचा मार्गच देशाला दिशा देऊ शकतो असं गुरुजींना वाटत होतं. गांधींचा सर्वांवर प्रेम करण्याचा संदेश देशाचे भविष्य घडवू शकतो यावर साने गुरुजींची श्रद्धा होती. आपल्या कविता, लेखनाने साने गुरुजी समाज प्रबोधनाचे काम करत होते.
नथुराम गोडसे महाराष्ट्राचा असल्याने साने गुरुजींना लाज वाटली.
कठोर हिंदुत्वाच्या विचारसरणीला मानणाऱ्या नथुराम गोडसेनी १९४८ च्या ३१ जानेवारीला दिल्लीत महात्मा गांधींचा गोळ्या घालून खून केला. महात्मा गांधी करत असलेल्या गोष्टी गोडसे आणि त्याच्या साथीदारांना पटत नव्हत्या. महात्मा गांधी यांच्या हत्येने पूर्ण देश स्तब्ध झाला होता. ज्या माणसाने आयुष्यभर अहिंसा शिकवली त्याचा शेवट गोडसेनी गोळ्या घालून केला.
महात्मा गांधी सारख्या नेत्याचा आपल्याच देशातील नागरिक हत्या करेल असे साने गुरुजींना वाटले कधीच नव्हते. स्वातंत्र्यानंतर देशात हिंदू मुस्लिम दंगली चालू होत्या. देश अस्थिर होता. अश्या वेळेला गांधींची भारताला गरज असताना गोडसेनी गांधींची हत्या केली.
नथुराम गोडसे मुळचा पुण्याचा होता. महाराष्ट्रातून जाऊन त्याने दिल्लीत गांधींचा खून केला हे कळल्यावर महाराष्ट्राचा नागरिक असे करू शकतो ह्यावर साने गुरुजींना विश्वास ठेवणे कठीण झाले होते. गांधी सारख्या नेत्याचा खून करणारा नथुराम महाराष्ट्रातला आहे आणि मी पण त्यांचं महाराष्ट्रातला आहे याची मला लाज वाटत असल्याचे उदगार साने गुरुजी यांनी गांधी हत्येनंतर काढले होते.
हे खास आपल्यासाठी
बलात्कार करणाऱ्यांची मानसिकता कशी असते ?
संत रोहिदास भारतातील एकमेव संत ज्यांना सोळा नावाने ओळखलं जातं.
मजुरांना घरी पाठवले नसते तर ते रस्त्यावर मरून पडले असते म्हणतोय सोनू सूद….