MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

आज्जीला भेटायला यावं लागल्याने रतन टाटा अविवाहित राहिले

why-ratan-tata-unmarried

मुंबईतल्या ताज हॉटेल हल्ल्यात मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी घेणारे रतन टाटा. आपला जुना कर्मचारी आजारी आहे कळल्यावर त्याच्या घरी भेट देऊन चौकशी करणारे रतन टाटा. कामगारांसोबत जेवण करणारे रतन टाटा. अश्या किती तरी कहाण्या रतन टाटा यांच्या प्रसिद्ध आहेत. रतन टाटांचं व्यावसायिक आयुष्य बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल. पण त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील अनेक घटना माहित नाहीत. रतन टाटा अविवाहित का राहिले असा अनेकांना प्रश्न आहे. आपल्या आज्जीला भेटण्यासाठी अमेरिकेतून भारतात आलेले रतन टाटा आयुष्यभर अविवाहित का राहिले हे आज समजून घेऊ. हा किस्सा आहे १९६२ चा !

रतन टाटा यांचे बालपण

२८ डिसेंबर १९३७ ला जन्मलेल्या रतन टाटा याना त्यांच्या आई वडिलांसोबत फार काळ राहण्याचे भाग्य मिळाले नाही. आई सोनू टाटा आणि वडील नवल टाटा हे दोघे रतन लहान असताना वेगळे झाले होते. आई वडील वेगळे झाल्यानंतर रतन टाटांचे पुढील आयुष्य त्याच्या आज्जी नवजबाई यांच्या सोबत गेले. शांत, हुशार आणि सर्वांची काळजी घेणारे रतन आजी नवजबाई यांचे लाडके होते. रतन टाटा त्यांच्या आज्जीच्या सर्वात जवळच्या होते. रतन टाटा यांचे दिसणारे सर्व संस्कार, त्यांचे महानपण हे त्यांच्या आज्जी नवजबाई यांचीच देणं आहे.

शिक्षणासाठी अमेरिकेला जावे लागले.

रतन टाटा यांचे बालपण मुंबईमध्ये गेले. प्राथमिक शिक्षण मुंबईत पूर्ण केल्यावर रतन टाटा महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेच्या हावर्ड विद्यापीठात गेले. टाटांनी तिथून त्या वेळचे अभियांत्रिकी आणि नंतर कॉर्नवेल विद्यापीठातून व्यावसायिक शिक्षण घेतले.

लग्नाचा विचार आणि आज्जीच दुखणं एकाच वेळेस.

वयाच्या २१ व्या वर्षी अमेरिकेत गेलेले रतन टाटा अमेरिकेमध्ये रुळले होते. शिक्षण संपल्यावर अमेरिकेमध्येच व्यवसाय करण्याचे टाटांनी ठरवले होते. त्यादरम्यान अमेरिकेतल्या एका तरुणीवर टाटांचे प्रेम जडले. काही काळ एकत्र घालवल्यावर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेतच लग्न करण्याचा त्यांचा विचार होता. टाटांच्या घरच्यांना भारतातून अमेरिकेत बोलावण्याचे ठरले होते. पण एका अनपेक्षित घटनेनें पुढील सर्व चित्र पालटून टाकले. टाटांनी आपल्या लग्नाचा निर्णय घरी कळवण्याच्या अगोदरच घरून त्यांना संदेश आला कि आज्जी नवजबाई आजारी आहेत. आपली लाडकी आज्जी आजारी असल्यामुळे रतन याना भारतात घरी जाणे महत्वाचे होते. भारतात जावे लागणार असल्यामुळे टाटांनी लग्नाचा विषय लांबवण्याचे ठरवले. अमेरिकेत परतल्यावर लग्न करण्याचा शब्द टाटांनी त्यांच्या प्रियसीला दिला आणि भारतात निघून आले.

रतन टाटा भारतात आले ते साल होते १९६२. भारत चीन युद्ध नुकतेच चालू झाले होते. त्यामुळे रतन टाटा अमेरिकेत परत येतील याची शाश्वती प्रियसीच्या घरच्यांना नव्हती. रतन टाटांच्या प्रियसीच्या घरचे त्यांच्या मुलीला युद्धाच्या परिस्थितीमध्ये भारतात पाठवण्यास अनुकूल नव्हते. एकंदरीत परिस्थिती अशी होती कि रतन यांच्या बद्दल त्यांच्या मनात अविश्वास वाढला आणि टाटांच्या प्रियसीच्या घरच्यांनी दुसऱ्या अमेरिकन मुलाबरोबर तिचे लग्न लावून दिले.

झालेल्या घटनेची रतन टाटांना कसलीही कल्पना नव्हती. अमेरिकेत परतल्यावर त्यांना प्रियसीने लग्न केले असल्याचे समजल्यावर धक्काच बसला. खऱ्या प्रेमाचा असा शेवट होईल अशी कधी कल्पना सुद्धा केली नव्हती. ही सल त्यांच्या मनात कायम राहिली आणि टाटांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. प्रेम विसरणं अवघड असतं म्हणूनच कदाचित रतन टाटा आयुष्यभर अविवाहित राहिले..

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.