MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

तेलंगणाचे मुख्यमंत्री ज्यासाठी धरणं देऊन बसलेत, त्या उकडलेला तांदळाचा काय प्रॉब्लेम झालाय ?

गेल्या आठवड्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव त्यांच्या मंत्र्यांसह धरणं देऊन बसले होते. एका राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ धरणं देऊन बसल्याची ही घटना नवीन अनअपेक्षित आहे. याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एकदा राज्यपालांच्या घरासमोर उपोषणाला बसले होते. केसीआर दुसरे मुख्यमंत्री आहेत. केजरीवाल यांचे कारण वेगळे होते पण केसीआर आंदोलन करत आहेत उकडलेल्या तांदळासाठी ! तुम्ही म्हणालं तांदळासाठी मुख्यमंत्री उपोषण करत आहे पण हा सब्जेक्ट डीप आहे.

उकडलेल्या तांदळाची मागणी कमी झाली असून गरजेपेक्षा जास्तीचा तांदूळ खरेदी करणं हा पैशांचा अपव्यय असल्याचं सांगत केंद्रानं हा तांदूळ खरेदी करण्याची प्रक्रिया थांबवणार असल्याचं सांगितलं आहे. केंद्रानं एकसमान धान्य खरेदी धोरण निश्चित करावं, अशी मागणी करत चंद्रशेखर राव यांनी केली आहे.
केंद्र सरकारनं या तांदळाची खरेदी बंद करण्याची तयारी सुरू केली आहे. पण तेलंगणा या तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक आहे. त्यामुळे साहजिकच केंद्राच्या या निर्णयाचा तेलंगणावर परिणाम होणारच. त्यामुळेच केसीआर केंद्राच्या विरोधात धरणं देत आहेत. पण हा उकडलेला तांदूळ काय असतो आणि त्याच्या किमतीचा काय प्रॉब्लेम झालाय याचा आपण आढावा घेतला आहे.

उकडलेले तांदूळ कसे तयार केले जातात ?

उकडलेले तांदूळ बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रियांचा वापर केला जातो. जस कि , मैसूरच्या सेंट्रल फूड टेक्नोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात सीएफटीआरआयमध्ये कच्चा तांदूळ आधी गरम पाण्यात तीन तास भिजवला जातो. जनरली तो ८ तास भिजवला जातो. यानंतर पाणी काढून टाकलं जातं आणि तांदूळ २० मिनिटं वाफवून घेतला जातो. त्यासोबतच सीएफटीआरआयमध्ये तांदूळ शेडमध्ये वाळवला जातो.

उकडलेल्या तांदळाचे फायदे देखील होतात

उकडलेला तांदूळ अधिक कडक होतो. यामुळे मळणी किंवा दळण्याच्या प्रक्रियेत तांदूळ तुटत नाही. उकडल्यामुळे तांदुळामधील पोषक मूल्य देखील वाढतात. याशिवाय, अशा प्रकारे उकडलेल्या तांदुळाला कीड किंवा बुरशी लागण्याचं प्रमाण कमी असतं.
तांदूळ उकडण्याचे काही तोटे देखील आहेत. यामुळे तांदळाचा रंग गडद होतो. खूप वेळ भिजवल्यामुळे कदाचित त्यातून दुर्गंधी देखील येऊ शकते.

उकडलेल्या तांदळाचा सरकारकडे साठा गरजेपेक्षा जास्त आहे

अन्न विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात १ एप्रिल २०२२ पर्यंत ४०.५८ लाख मॅट्रिक टक इतका उकडलेला तांदूळ आहे. यापैकी तेलंगणामध्ये (१६.५२ लाख मेट्रिक टन) आहे त्याखालो खाल तमिळनाडू (१२.०९ लाख मेट्रिक टन) आणि केरळ (३ लाख मेट्रिक टन) या राज्यांचा क्रमांक लागतो. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये उकडलेल्या तांदळाचा साठा ०.०४ ते २.९२ लाख मेट्रिक टन च्या दरम्यान आहे.
२०२०-२१ च्या खरीप हंगामात केंद्र सरकारने तेलंगणाकडून १.३६ लाख मेट्रिक टन उकडलेला तांदूळ खरेदी केला. सध्या सुरू असलेल्या २०२१-२२च्या खरीप हंगामात फक्त झारखंड (३.७४ लाख मेट्रिक टन) आणि ओडिसा (२.०८ लाख मेट्रिक टन) या दोन राज्यांकडून मिळून ५.८२ लाख मेट्रिक टन इतका उकडलेला तांदूळ केंद्र सरकार खरेदी करणार आहे. याशिवाय तेलंगणा सोबत दुसऱ्या १० उत्पादक राज्यांकडून तांदूळ खरेदी करण्याचा केंद्राचा इरादा नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये देशातला एकूण उकडलेल्या तांदळाचा साठा ४७.७६ लाख मेट्रिक टनांवर जाण्याचा अंदाज आहे.

तांदळाची मागणी किती आहे ?

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत देशभरात पुरवठा करण्यासाठी एकूण २० लाख मेट्रिक टन इतक्या उकडलेल्या तांदळाची मागणी केंद्राकडून अंदाजित होती. पण अन्न पुरवठा मंत्रालयच्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांत अशा तांदळाच्या मागणीत मोठी कमी आली आहे. मागच्या हंगामात केरळ, झारखंड आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये अशा तांदळाचं उत्पादन वाढलं आहे. त्यामुळे कधीकाळी अशा तांदळाची गरज असणाऱ्या राज्यांमधून त्याची मागणी घटली. सुरुवातीला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून या राज्यांना तांदूळ पुरवण्यासाठी तेलंगणासारख्या राज्यांकडून खरेदी केला जात होता. पण याच राज्यांमध्ये आता उत्पादन वाढलं आहे. त्यामुळे पुढील दोन वर्ष गरज भागवू शकेल, इतका उकडलेल्या तांदळाचा साठा उपलब्ध आहे, असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.

केंद्र सरकार जरी मागणी पूर्ण झाल्यामुळे उकडलेल्या तांदळाची खरेदी बंद करत असलं. मुख्यमंत्री केसीआर यांना मात्र तेलंगणाच्या जनतेला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळेच केसीआर केंद्राशी पंगा घेताना दिसत आहेत. आपल्या महाराष्ट्रात देखील तुरीच्या बाबतीत दोन वर्षपूर्वी अशीच स्थिती निर्माण झाली होती.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.