MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

अपर्णा सिंग भाजपमध्ये गेल्या कारण अखिलेश आणि त्यांच्या सावत्र आईचा वाद आहे.

aparna yadav news marathi

केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीमध्ये अपर्णा सिंग यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. निवडणूक तोंडावर आली आहे आणि आपल्या घरातले लोकच विरोधी पक्षामध्ये जात असल्यामुळे समाजवादी पक्षाच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. का गेल्या अपर्णा सिंग यादव समाजवादी पक्षाला सोडून आणि काय आहे त्यांचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे.

२०११ ला प्रतीक यादव यांच्याशी लग्न.

मुलायम सिंग यादव यांचा छोटा मुलगा प्रतीक शिकण्यासाठी लंडनच्या लीड्स विद्यापीठात होता. त्याच दरम्यान अपर्णा सुद्धा राज्यशास्त्रात पदवी घेण्यासाठी लंडनला गेलेल्या. लंडन मधेच दोघे एकमेकांना आवडायला लागले आणि त्यांना प्रेम झाले. आठ वर्ष सोबत राहिल्यावर २०११ ला प्रतीक आणि अपर्णा यांचा विवाह झाला. देशातले सर्व महत्वाचे राजकारणी, व्यावसायिक त्यांच्या लग्नाला उपस्थित होते .

अपर्णा यादव फक्त नावाला, राजकारण चालूय साधना गुप्तांचं.

अपर्णा यांची पदवीच राज्यशास्त्रात असल्यामुळे मुळे त्यांना राजकारणाची आवड आहे. आणि त्यांच्या घरात मोठे मोठे महारथी राजकारणात आहेत म्हणल्यावर राजकारण आलेच. पती प्रतीकला मात्र स्वतः राजकारणापासून दूर राहायचे असल्यामुळे त्याने अपर्णाला राजकारण करण्यास मोकळीक दिली. तिला साथ मिळाली सासू साधना गुप्ता यांची. साधना गुप्ता ह्या मुलायमसिंग यांच्या दुसऱ्या पत्नी. साहजिकच साधना गुप्ता यांना पाहिजे तेवढा मान, सन्मान मिळाला नाही. अखिलेश यादव यांनी पक्षाची सूत्र हाती घेतल्यावर तर त्यांची जास्तच उपेक्षा सुरु झाली. त्यामुळे साधना यांनी त्यांच राजकारण अपर्णा यांच्या माध्यमातून चालू ठेवलं. अपर्णा यांचं पूर्ण राजकारण त्यांची सासू साधना ह्याच करत असल्याचं बोललं जात. २०१७ नंतर अखिलेश यादव आणि साधना यांच्यात मतभेद खूप वाढले. साधना यांनी समाजवादी पक्षामध्ये त्यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र अखिलेश असताना आपल्याला ते करता येणार नाही हे समजल्यावर साधना यांनी शेवटचा पत्ता काढला. अपर्णाला पक्ष सोडून भाजप मध्ये जायला सांगितले.

अपर्णा यांचा भाजपाला फायदा होईल का ?

अपर्णा यादव यांनी समाजवादी पक्ष सोडल्यामुळे तसा काही विशेष फायदा होणार नाही. कारण अपर्णा यांचे फार मोठे समर्थक समाजवादी पक्षामध्ये नव्हते. पण भाजपचे स्वतःचे मंत्री समाजवादी पक्षामध्ये जात असताना जर विरोधी पक्षाच्या घरचे सभासद भाजपमध्ये येत असतील तर तो प्रचारासाठी चांगला मुद्दा होऊ शकतो. त्यामुळेच भाजपने अपर्णा यांना पक्षामध्ये घेतले असावे. समाजवादी पक्षाला मात्र यातून फायदा होण्याची शक्यता आहे. कारण अखिलेश याना प्रचारासाठी एक मुद्दा मिळाला आहे कि भाजप फोडा फोडीचं राजकारण करत आहे. त्यामुळे अपर्णा यादव यांचा भाजपाला फायदा कमी आणि तोटाच जास्त होण्याची शक्यता आहे .

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.