स्टँडअप कॉमेडी हा नवा प्रकार विनोदाच्या दुनियेत चांगला जोरात सुरु आहे. वीर दास, कुणाल कामरा, झाकीर खान, मनूवर फारुकी, अतुल खत्री हे स्टॅन्डअप कॉमेडियन तरुणांमध्ये प्रसिद्ध आहेत. वीर दासने अमेरिकेतील जॉन एफ केनेडी सभागृहात स्टॅन्डअप करताना भारताचा अपमान केला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष नि इतर लोक करत आहेत. वीर दासच्या विरोधात भारताच्या अनेक शहरांमध्ये पोलीस तक्रारी केल्या आहेत तर डावे लोक आणि संघटना वीर दासचे समर्थन करत आहेत.
वीर दासची कविता काय आहे.
(खालील युट्यूब व्हिडिओ बघा )
या कवितेचा अनुवाद असा आहे.
मी दोन भारतातून येतो…..
Vir Das Poem I come from two India’s
मी त्या भारतातून येतो जिथे लहान मुले मास्क घालून नियमांचे पालन करतात आणि मी त्याही भारतातून येतो जिथे नेते बिना मास्कचे लोकांना कोरोनाचे धडे देतात.
मी त्या भारतातून येतो जिथे दिवसा महिलांची पूजा करण्याचं बोलतात आणि मी त्याही भारतातून येतो जेथे रात्री महिलांवर बलात्कार होताना दिसतात.
मी त्या भारतातून येतो जिथे बॉलीवूड देशाला विभाजित करत असल्याचा आरोप होतो आणि मी त्याही भारतातून येतो जो बॉलीवूड चित्रपटगृहांच्या अंधारात देशाला एक करतो.
मी त्या भारतातून येतो जिथे सेक्सवर बोलणं घाण मानलं जात आणि मी त्याही भारतातून येतो ज्या भारताची लोकसंख्या १०० कोटीच्या वर गेली आहे.
मी त्या भारतातून येतो जिथे पत्रकारिता जवळपास मेली आहे आणि मी त्याही भारतातून येतो जिथे तरुण स्वतंत्र पत्रकारिता करत आहेत.
मी त्या भारतातून येतो जिथे तरुणांची संख्या सर्वात मोठी आहे आणि मी त्याही भारतातून येतो जिथे तरुण ७५ वर्षाच्या नेत्याकडून १५० वर्ष जुने विचार ऐकतात.
मी त्या भारतातून येतो जिथे लोक रस्त्यावर झोपतात आणि मी त्याही भारतातून येतो ज्या भारतात २० वर्षाचे तरुण क्लब मध्ये दिसतात.
मी त्या भारतातून येतो जिथं शाकाहारी संस्कृती आहेत आणि मी त्याही भारतातून येतो ज्या भारतात शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडलं जात.
मी त्या भारतातून येतो जिथं जवानांचा आदर केला जातो आणि मी त्याही भारतातून येतो जिथे जवानांना त्यांची पेन्शन वेळेवर मिळत नाही.
मी त्या भारतातून येतो जिथे संगीत खूप हार्ड ऐकले जाते आणि मी त्याही भारतातून येतो जिथे लोकांच्या भावना मात्र खूपच नाजूक आहेत.
मी त्या भारतातून येतो जे लोक कधी वेळेवर कुठेही जात नाहीत आणि मी त्याही भारतातून येतो जे भारतीय लोक मात्र कोवीन अँपवर सगळे वेळेवर जमतात.
मी त्या भारतातून येतो जिथे लोक घरी अभिमानाने नोकर ठेवतात आणि मी त्याही भारतातून येतो जिथे लोक अमेरिका आणि इतर ठिकाणी नोकरी करायला जातात.
मी त्या भारतातून येतो हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी हे वेगवेगळे ओळख जपतात पण जेव्हा आकाशाकडे बघतात तेव्हा सगळ्यांची एक सामान समस्या आहे ते म्हणजे पेट्रोलचे वाढलेले भाव.
मी त्या दोन भारतातून येतो जिथे दिल्ली पासून दूर असलेले तरुण सरकारला प्रश्न विचारात आणि मी त्या भारतातूनही येतो ज्या भारताचे लोक सरकारला खूप घाबरतात.
मी दोन भारतातून येतो…..
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !