MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

चीन महासत्ता कसा झाला ?

china the supreme power

जगभरातल्या बातम्या आणि थोडी माहिती असणारे वाचक असे म्हणतील चीन आणि महासत्ता काहीही लिहता का ? चीन कधी महासत्ता झाला ? आम्ही तर वाचलंय जगात फक्त अमेरिका एकटीच महासत्ता आहे आणि चीन भारतासारखाच एक विकसनशील देश आहे. तर वाचक मित्र मैत्रिणींनो परिस्थिती बदलली आहे. चीन सध्या जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. जगाच्या एकूण व्यापार पैकी १०% व्यापार चीन करतो. रोजच्या जीवनाला लागणाऱ्या गरजेच्या जवळपास सगळ्या वस्तू चीन मधून जगभरात पाठवल्या जात आहेत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन आज अमेरिकेच्या पुढेआहे असं म्हणायला हरकत नाही. महासत्ता असण्याचा काही मापदंड नाही पण चीनने केलेल्या प्रगतीमुळे जग आज हळू हळू चीनला महासत्ता मानत आहे. चीनने केलेल्या प्रगतीची कथा प्रत्येक देशाने शिकण्यासारखी आहे ती आपण समजून घेतली पाहिजे.

चीनचा इतिहास काय सांगतो?

चीनमध्ये भारतासारखे ब्रिटिश किंवा इतर परकीय राज्य करत नव्हते. एक जपानचा हल्ला झाला तो सोडून चीनवर परकीय आक्रमण झाले नाही. दक्षिण आणि उत्तरेला पर्वत, पश्चिमेला चीनची मजबूत भिंत आणि पूर्वेला चिनी समुद्र असल्यामुळे चीन परकीय आक्रमणापासून बचावला आहे. हजारो वर्षांपासून चीनमध्ये राजेशाही होती. राजाचा मुलगा राजा होत असे. २० व्या शतकापर्यंत हेच चालू होते.
मार्क्स आणि लेनिन कडून प्रेरणा घेऊन माओने राजाला हटवून १९४९ ला चीन मध्ये कम्युनिस्ट क्रांती केली. राजेशाही असलेल्या चीनला माओने कम्युनिस्ट(साम्यवादी) केले. जगभरात सगळे कम्युनिस्ट देश कमी अधिक प्रमाणात कोसळले मात्र चीन एकमेव देश आहे ज्या देशात नुसते कम्युनिस्ट टिकले नाही तर चीन आज महासत्ता झाला आहे.

कम्युनिस्ट चीनने जगाला कसे केले अचंबित?

कम्युनिस्ट देशाचा तसा इतिहास चांगला नाही. त्यात हे चीन जगाशी संपर्क न ठेवणारे. इतिहासात चीनने जगाला त्यांच्या देशापासून लांबच ठेवले होते. भीती असेल किंवा काही कारण पण जग चीन पासून अगदी २००० साल येईपर्यंत लांबच होतं. त्यामुळे चीनमधील कम्युनिस्ट शासन जास्त काळ टिकणार नाही, चीनचे लोक कम्युनिस्ट लोकांच्या विरोधात बंड करतील असाच सगळ्यांचा अंदाज होता. चीनने मात्र सगळ्यांना चकमा दिला. चीन मधील कम्युनिस्ट शासन पडले नाही आणि चिनी लोकांनी कधी कम्युनिस्ट सरकारच्या विरोधात मोठी आंदोलने देखील केली नाहीत. अपवाद फक्त एक १९८९ साली लोकशाहीच्या मागणीसाठी चिनी तरुणांनी बीजिंग मध्ये प्रदर्शने केली होती.

दोन दशकात पाया मजबूत करून घेतला

माओने चीनची सूत्रे हातात घेतल्यावर त्याने चीनमध्ये त्यांच्या पद्धतीने शासन केले. माओ हुकूमशहा होता त्यामुळे त्याच्या काळात चीनचे भले झाले असे म्हणता येणार नाही. उलट माओने सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली हजारो चिनी लोकांना मारले. १९७६ ला माओच्या निधनानंतर मात्र चीनला चांगले शासक मिळाले. डेंग झिम्पोंग सारख्या अध्यक्षानी चीनला जगाच्या बाजारात आणले. चीनमध्ये जगभरातल्या कंपन्यांना गुंतवणूक करायला बोलावले आणि तिथूनच चीनचा कायापालट होण्यास सुरुवात झाली. चीनमध्ये जगातील सर्वात जास्त लोकसंख्या होती. कम्युनिस्ट सरकारने चिनी लोकांना चांगले शिक्षण दिल्याने चीनमध्ये साक्षरता वाढली होती. त्यामुळे जगभरातल्या इतर कोणत्याही देशांपेक्षा चीनमध्ये कमी पैशात मजूर, कामगार मिळत होते. कमी खर्चात चीन मध्ये आपण वस्तूंची निर्मिती करू शकतो या उद्देशाने जगभरातल्या कंपन्या चीनमध्ये गेल्या. चिनी सरकार नवीन कंपन्यांना खूप स्वस्तात जमिनी उपलब्ध करून देत होते. बाहेरच्या गुंतवणुकीसाठी स्पेशल इकॉनामिक झोन चिनी सरकारने बनवले होते. बाहेरून येणाऱ्या कंपन्यांसाठी सगळ्या सोयी चिनी सरकार देत होते.
माओच्या निधनानंतर सुरु झालेल्या जागतिकीकरणाने चीनमध्ये दोनच दशकामध्ये क्रांती केली होती. २००० साल येईपर्यंत चीनमध्ये जगभरातल्या सगळ्या कंपन्या पोहचल्या होत्या. जगापासून दूर असलेले चीन आता जगाची उत्पादन फॅक्टरी झाली होती. कोरोना महामारीमध्ये चीन काही काळ बंद होतं. तेंव्हा जगभरात रोजच्या वस्तू मिळणे कठीण होऊन बसले होते. कारण बहुतेक वस्तूंची निर्मिती चीनमध्ये होते आणि मग तेथून त्या जगभरात पोहचवल्या जातात.

२००१ नंतर चीनने जगाच्या बाजारपेठा काबीज करायला सुरुवात केली

ओसामा बिन लादेनने केलेला वर्ल्ड ट्रेंड सेंटरवरचा ९/११ चा हल्ला आपल्या सगळ्याना माहित असेल. २००१ सालची सगळ्यात महत्वाची ती घटना होती पण २००१ सालीचं आणखी एक महत्वाची घटना झाली त्याकडे कोणाचं फारसा लक्ष गेलं नाही. २००१ च्या डिसेंबर मध्ये जागतिक व्यापार संघटनेचा चीन सभासद झाला. चीनचा जागतिक व्यापार संघटनेचा सभासद होणं खूप मोठी घटना होती कारण चीन त्यांची १०० कोटी लोकांची अर्थव्यवस्था जगासाठी पूर्ण खुली करत होता. २००१ साली कोणाला याची कल्पना आली नाही मात्र आज चीनने जगाची बाजारपेठ काबीज केल्यावर ती घटना किती महत्वाची होती याची प्रचिती येते.
१९८० ते २००० दरम्यान चीनने उद्योग उभे केले. जगभरातल्या चांगल्या कंपन्यांना चीनमध्ये बोलवून चिनी लोकांना रोजगार दिले. चिनी कामगारांना जागतिक दर्जाचं काम शिकवण्यासाठी जगभरातून तज्ज्ञ बोलावले. २००० पर्यंत चीन उत्पादनाच्या बाबतीत चांगलेच मोठे झाले होते. जगतातील सर्वात जास्त उत्पादन चीन मध्ये होण्यास सुरु झाले होते. स्वतःच्या किमान गरजा पूर्ण करण्यापुरती अर्थव्यवस्था चीननं २००० सालापर्यंत उभी केली होती.
आपण जगाला माल पुरवू शकतो हा विश्वास आल्यावर चीनने जागतिक व्यापारामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. जागतिक व्यापार संघटनेसारख्या संघटनांचा फायदा घेऊन चीनने अनेक देशांसोबत मुक्त व्यापाराचे करार केले. चीन आज जगात सर्वात जास्त वस्तूंची पुरवठा करणारा देश बनला आहे. अगदी घरामध्ये लागणाऱ्या छोट्या वस्तूंपासून तर मोबाइलला सारख्या साधनांपर्यंत चीन जगाची मागणी पूर्ण करत आहे.
व्यापाराच्या वाढीमुळे चीनची अर्थव्यवस्था पंधरा लाख कोटींची झाली आहे. सध्या चीनच्या पुढे फक्त अमेरिका आहे. १९८० पर्यंत भारताच्या गतीने प्रगती करणारा चीन आज भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा पाच पट मोठा झाला आहे. चीनमधील गरिबी जवळ जवळ संपत आली आहे. चीन आज बाकीच्या देशांना कर्ज देत आहे.”बेल्ट आणि रोड” नावाने चीनने जग जोडण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. आफ्रिकेसारख्या खंडामध्ये अमेरिकेपेक्षा जास्त प्रभाव चीनने तयार केला आहे. त्यामुळे चीन आपल्याला आवडो वा नावडो मात्र चीन महासत्ता झाला आहे हे सत्य आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.