आपण घेत असलेलं औषधाचा वारसा जसा शेकडो वर्ष्यांपासून चालत आलेला आहे तसा औषधाची मानवी.
चाचणीचा ( Clinical Trials ) चा इतिहास खुप जुना म्हणजे काही शेकडो, वर्षांपूर्वीचा आहे,
( What is clinical trial history ? )
पण आपण १९ व्या शतकात डोकावू. साधारणतः १९४२ चं साल असेल.
जर्मनीत कशी क्रूरपणे या औषधांच्या चाचणीला सुरवात होती ?.
मलेरिया रोगाचं औषध शोधण्यासाठी सर्वज्ञात असलेल्या जर्मनीच्या नाझी छळ छावणी मध्ये प्रयोग चालू होते. यासाठी छळ छावणीत कोणताही रोग नसलेली व्यक्ती व मुल यांना मलेरिया उत्पन्न करणाऱ्या डासाच्या श्लेष्मा ग्रंथी ( Mucus Gland ) चा पदार्थ बाहेर काढून त्याचं इंजेक्शन निरोगींना देवून मलेरियाचा रोगी बनवलं जायचं. अतिशय अमानवी पद्धतीने वेगवेगळ्या औषधांचा प्रयोग यांच्यावर केला जायचा. जवळ जवळ १२०० लोकांवर हा प्रयोग केला, त्यातील निम्म्याहून जास्त लोकं मृत्युमुखी पडले असतील तर जे वाचले त्यांना कायम व्यंगत्व आलं.
असाच एक प्रयोग जनुकीय जुळे म्हणून जन्माला आलेल्या व्यक्तिंच्या जोडीवर विवीध प्रयोग केले जायचे, त्यात एका वर प्रयोग करून त्याचा परिणाम दुसऱ्यावर तपासला जायचा, या अमानुष प्रयोगात एक मेला तर दुसऱ्याला मारलं जायचं व दोन्ही मृत देहातील शव विच्छेदन अहवालाची तुलना केली जायची.
असे एक ना अनेक अतिशय क्रूर मानवी प्रयोग इतिहासाने पाहीले आहेत. जर्मन छळ छावणीचे उदाहरण फक्त एवढ्यासाठी की खूप कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खूप वाईट पद्धतीचे प्रयोग झाले आणि यात खूप लोकांनी आपला जीव गमावला तर जे जगले ते जिवंत नरक यातना भोगत होते.
औषधांच्या मानवी प्रयोगाच्या कायद्याची सुरवात कशी झाली ?
दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर १९४५ साली तत्कालीन जर्मन राष्ट्राध्यक्ष यांच्या परवानगीने अमेरिका, सोव्हिएत युनियन व ग्रेट ब्रिटन यांच्या नेतृत्वाखाली नाझी पक्षाच्या सदस्यांना युद्ध गुन्हेगार घोषित करण्यासाठी एक सर्वेक्षण करण्यात आलं यामध्ये आपली बाजू मांडताना बऱ्याच डॉक्टरांनी नमूद केलं की औषधांचा मानवी प्रयोग ( Clinical trials ) यासाठी कोणताही कायदा, नियम किंवा मार्गदर्शक तत्त्वे अस्तित्वात नाहीत. ही बाब अतिशय महत्त्वाची वाटल्याने या प्रक्रियेत सहभागी असलेले डॉक्टर अँड्रू व अलेक्झांडर यांनी आपल्या अहवालात या गोष्टी स्पष्ट नमूद केल्या व हा अहवाल तत्कालीन संयुक्त अमेरिका महायुद्ध गुन्हे समितीपुढे मांडला. सोबत औषधांचा मानवी प्रयोग यासाठी ६ मुद्यांची नियमावली दिली. या सर्वांचा अभ्यास करून समितीने २० ऑगस्ट १९४७ रोजी आपला निकाल जाहीर केला ज्यामध्ये अहवालातील ६ मुद्दे व काही वैद्यकीय तज्ञांच्या मदतीने आणखी ४ मुद्दे टाकून १० मुद्द्यांची एक मार्गदर्शक नियमावली जाहीर केली.
याला नुरिमबर्ग ट्रायल्स असा देखील का म्हणतात ?
( Why it also called as Nuremberg trials ? )
हे सर्व चालू झालं जर्मनीच्या नुरिमबर्ग या शहरात म्हणून याला नुरिमबर्ग ट्रायल्स असं ओळखलं जातं. औषधांच्या मानवी प्रयोगात ही घटना कायम स्वरूपी एक मोठा मैलाचा दगड आहे. याच आधारावर मानवी हक्क आयोग वा इतर संघटना, देश यांचे औषधाच्या मानवी चाचणीचे जगभरातील देशांचे नियम , कायदे व अटी तयार झाल्या आहेत.
जेव्हा रक्षकच भक्षक कसा बनला ?.
साधारणतः १९९६ सालची गोष्ट असेल. नायजेरिया या देशात इन्फ्लुएंझाची साथ आली आणि लहान मुले मृत्युमुखी पडू लागली. अमेरीकेतील एक जगप्रसिद्ध औषधी कंपनीने लगेच या ठिकाणी एक औषध पाठवले ज्याचा याआधी लहान मुलांवर वापर झालेला नव्हता.
या औषधाने मुले बरी होण्याऐवजी मृत्युमुखी पडू लागली दिवसाला काही शे आकड्यांत मृत्युचं हे थैमान चालू होतं. तर काहींना कायमस्वरूपी सांध्याचे आजार झाले. खोलात जेव्हा या गोष्टीचा उलगडा झाला तेव्हा या कंपनीने हे औषध मानवी चाचणीसाठी वापर केला आहे हे कळलं. याची परवानगी होती आणि ज्यांना औषध दिले त्यां मुलांच्या पालकांची सर्व धोके सांगून पूर्व परवानगी घेतली होती का हे विचारल्यावर या कंपनीने कुनो वैद्यकीय संस्थेचं १९९७ चं परवानगी पत्र दिलं. वस्तुतः १९९६ सालापर्यंत या संस्थेत इथिकल ( Ethical ) समीतींच अस्तित्वात नव्हती आणि ज्या पालकांच्या प्रश्नात तोंडी पूर्व कल्पना दिली असं सांगण्यात आलं कारण कंपनीचा दावा होता की या लोकांना लिहीता वाचता येत नाही. सखोल चौकशीत उघडकीस आलं की येथील लोकं इंग्रजी, खोसा व उर्दू लिहू शकतात, बोलू शकतात व समजूही शकतात याचा अर्थ असा की नायजेरियातील लोकांना अंधारात ठेवून या भयानक मानवी चाचणीचा प्रयोग अतिशय अमानवीय पद्धतीने करण्यात आला होता.
“कोरोना च्या मानवी चाचणीसाठी जगाने आफ़्रिका खंडा कडे रिकाम मैदान म्हणून मुळीच पाहू नये.”
अशी अनेक औषधांच्या अमानवी चाचणीचे उदाहरणं इतिहासाने पाहीली आहेत. काही सामाजिक संस्था या अशा प्रकारांवर बारीक नजर ठेवून असतात, वेळोवेळी या विरोधात आवाजही उठवत असतात. जरासं भूतकाळातून बाहेर येवू, काही दिवसांपूर्वी जागतिक़ आरोग्य संघटनेच्या ( WHO ) प्रमुखांनी एक विधान केलेल काळजी पूर्वक अठवा, ते म्हणाले होते, “कोरोना च्या मानवी चाचणीसाठी जगाने आफ़्रिका खंडा कडे रिकाम मैदान म्हणून मुळीच पाहू नये.” जाणिवपूर्वक का म्हणाले असतील ते अस ? कारण, ज़ेव्हा चाचणी करताना भयानक यातना सोसत मरण येत असत, अश्या वेळेस समाजातील दुर्बल घटका कडे सगळे नजर लावून असतात. ग़रीबी, कमी शिक्षण याचा फायदा घेवून खोटी आमिषे किंवा अधर्वट माहिती देवून अशांना मृत्यू खाईत जाणीव पूर्वक ढकलल जात. अर्थात हा इतिहास आहे, तशी शाक्यता सध्या नाही.
औषधांचं जग हे कितीही मोठं आणि विस्तृत असलं, तरी याचा सर्वात महत्वाचा घटक ‘आपणच’ आहोत.
हे खास आपल्यासाठी
महिला आणि पुरुषांमध्ये जननेंद्रियाचा क्षयरोग – जाणून घ्या याबद्दल सर्व काही
ऑटो रिक्शा चालकांमध्ये टीबी चे प्रमाण
पोट दुखतय ? टीबी तर ना , होय असू शकतो टीबी.. काय आहेत लक्षणे वाचा.