MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

दि.२९ सप्टेंबर जागतीक ह्रदय दिन म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्ताने..

दि.२९ सप्टेंबर जागतीक ह्रदय दिन म्हणून साजरा केला जातो

“आहो, त्या काकूंचा मुलगा अवघा २३ वर्षाचा पण त्याला ह्रदय विकाराचा झटका आला…!”, “यांचा ना , बी.पी. सारखाच high असतो …”, “मामाच्या खुप छातीत दुखत होत, डॉक्टर कडे गेल तर कळाल ह्रदययाचा त्रास आहे”,

“डॉक्टर म्हणतात याचा कोलेस्टेरोल जास्त आहे.” हे एक ना अनेक ह्रदय विकाराशी निगडी निदान आपल्या घरात , अजूबाज़ूला ऐकन अता दुर्मिळ राहिल नाही.

भारतात सगळयात जास्त मृत्यू जर कशामुळे होत असतील याचा अभ्यास केला तर लक्षात येत की, रोड ऐक्सिडेंटचा नं दुसरा लागतो, पहिला नं हा ह्रदय विकार व त्यासबंधी होणारे आजार याचा आहे. ११९० च्या दशकात एकूण मृत्यूच्या १५ % असणारा ह्रदय विकाराचा वाटा आज २०१९ मधे २८ % होवून बसला आहे.

तर काय कारण असेल एवढया मोठया प्रमाणात हा आकडा वाढण्याचा ?

अर्थशात्रीय संदर्भ घेऊन. विचार केला तर अस लक्षात येईल कि साधारणत: १९९१ साली भारताने जागतिकरणासाठी आपल्या बाजार पेठा खुल्या केल्या आणि भारतात जागतिकीकणाचे वारे वाहू लागले. भारतात. मोठया प्रमाणात पश्चिमात्य संस्कृतीच उद्दात्तीकरण. चालू झाल.भरपूर पैसा खेळू लागला.. मग खाण्या-पिण्याच्या सवयी बदललेल्या.

फ़ास्ट फ़ूड ने तुमच्या आमच्या आयुष्यात वाइल्ड कार्ड. एंट्री केली. तेलकट आणि मसालेदार तसेच एक ना अनेक जंक फूड. कडे लोकांचा कल वाढला. पैसे आल्याने जीवनाला गती आली अन खाण्याचा सवयी पण बदलल्या. यामागचे मूळ लक्षात घेतले तर समजून येईल कि जगभरातील मॅक्डोनल्ड सारख्या अनेक जंक फूड च्या चेन चालू झाल्या . जाहिरातीच्या युगात हे पसरायला वेळ नाही लागला आणि यामागे कंपन्या भरमसाठ पैसे ओतत होत्या. चैनी च्या गोष्टी करत करत माणूस कधी याच्या आहारी गेला कळलंच नाही.

एक उदाहरण द्यायचे झाल्यास. माझे काही मित्र म्हणतात. “तु दारू पित नाही? तु सिगारेट ओढत नाही ? किती ओल्ड फँशन्ड आहेस.. “ मग मी म्हणतो, “हे आयुष्य असूच शकत नाही.” कारण. मद्यपान व धूम्रपान चैनीच्या गोष्टी न राहता एक स्टेटस सिम्बल बनवून घेतले आहेत. अन मला अश्या सिम्बॉल ची जगण्यासाठी गरज नाहीये. किती हि टेम्पेटशन झाले तर चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत हे मी सगळयांना सांगत असतो. अर्थात कोणी काय कराव? हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. फक्त स्वतःच्या समाधानासाठी स्टेटस सिंम्बलची जोड देने बरोबर नाही.

असो, तर मित्रांनो हीच कारणे आहेत, ते म्हणजे आपली. बदलेली जीवनशैली म्हणजेच लाईफस्टाईल, रात्रीची जागरणे , कामाचा ताण , खाण्याच्या बदललेल्या वेळा , अति अपेक्षेपोटी वाढवून घेतलेला आर्थिक बोजा असे एक ना अनेक कारणे आहेत, जिथे माणूस आपल्या आरोग्याकडे लक्ष न देता वावहत जातो आणि मग त्याच रूपांतर हृदय विकारात होते, अन कमी वयात अकाली मरण हे काही नवीन राहील नाही अता .

म्हणून मला वाटत, धकाधकीच्या जीवनात आपल्या कक्षा आपल्याला माहीत असायला हव्यात, त्यानुसार काळजी घ्यायला हवी. अवास्तव सवयी लावून न घेता. वागन बदलल तर, जगन फ़क्त तुमचच नाही, तर तुमच्या बद्दल ज्यांना काळजी वाटते, त्यांचही सुखकर होईल. “काळजी घ्या तुमच्या ह्रदयाची मग त्यातील माणसांची काळजी घ्यायला तुमच ह्रदय खंबीर आहेच की.”

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.