भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या सरकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल हाताळताना...
एअर इंडिया टाटाची कंपनीची झाल्यामुळे विमानाची उडान भरतानाची सूचना बदलणार आहे. एअर इंडिया मधून प्रवास करणाऱ्या प्रवास्यांना,
'हॅलो,. हॅलो धिस इस युअर कॅप्टन स्पिकिंग , वेलकम तो टाटा एअर लाईन्स.' हि सूचना ऐकायला मिळणार आहे.
पुष्पा चित्रपटाच्या एका आठवडा आधी दक्षिणेत अखंडा हा चित्रपट रिलीज झाला होता. हिंदी बेल्ट मध्ये...
डॉ अनिल अवचट एका पेशात जगले नाहीत. ते गरीब लोकांचे प्रश्न मांडणारे पत्रकार होते, लोकांना व्यसनापासून दूर करणारे डॉक्टर होते. मनाची बाजू लिहणारे कवी होते, जगण्याची दिशा स्पष्ट करणारे साहित्यिक होते.
जब वी मेट हा बऱ्याच लोकांसाठी असा चित्रपट आहे कि लोक स्वतःच्या आयुष्याला यात जास्त...
महात्मा गांधी म्हणायचे विचाराशिवाय राजकारण होऊ शकत नाही . तुम्ही आता म्हणाल , राजकारणात कोणाला विचार आणि विचारधारा असते ? आज ह्या पार्टीत तर उद्या त्या पार्टीत हे सर्रास चालत कि. तर तुमचं खरंय. आजच्या राजकारणाकडे थोडं बारकाव्याने बघितलं कि असच दिसत. पैसे कमावणे हा एकमेव विचार शिल्लक राहिल्याचं वाटून जात. पण थांबा तुमचं लाल बावट्यावाले कार्यकर्त्यांबद्दल वाचायचं राहील आहे . आता हे लाल बावट्यावाले कोण तर कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते . जे एकमेकांना कॉम्रेड म्हणतात . कॉम्रेडला शुद्ध मराठीत आपण सहकारी म्हणू शकतो .पण कॉम्रेड मध्ये जी क्रांती आहे,जो जोश आहे तो सहकारी शब्दात कुठे . त्यामुळे ते एकमेकांना कॉम्रेड अशीच हाक मारतात . तर असो कार्ल मार्क्सचे समाजवादी विचार घेऊन राज्य करायचं हे त्यांचं ध्येय . लेनिनने ती क्रांती रशियामध्ये करून दाखवली. पण इतर ठिकाणी जमली नाही . इतर ठिकाणी क्रांती यशस्वी झाली नसली तरी आम्ही ती एक दिवस नक्की करून दाखवू असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे क्रांती करायची असेल तर क्रांतीला पूरक वागावे लागेल, जनतेची कामे करावी लागतील ,सरकारच्या विरोधात संघर्ष करावा लागेल ह्यावर सर्व कॉम्रेडच एकमत आहे . सरकार आपल्या संघर्षची धार कमी करण्यासाठी आपल्याला कधी कधी पुरस्कार सुद्धा देऊ शकत त्यामुळे कॉम्रेड्सनी सरकारी पुरस्कार स्वीकारायचे नाही असा एक अलिखित नियम केला आहे. त्यामुळे कुठलाही कॉम्रेड सरकारी पुरस्कार स्वीकारत नाहीत.बुद्धदेब भट्टाचर्यांनी पण त्याच नियमाचे पालन करून पद्मभूषण नाकारला आहे. बाकी पक्षातले लोक कितीही पार्ट्या बदलू द्या पण लालबावट्यावाले विचार आणि विचारधारा सोडत नाहीत हे बुद्धदेब भट्टाचार्यानी दाखवून दिलय.
दहा बारा खोलीची सातवी पर्यंतची शाळा आमची,से दोनशे पोर पोरी असतील सगळे मिळून.काही आमच्या गावातले तर उरलेले आजू बाजूच्या खेड्या पाड्यातले.ज्यांच्या कडे सायकली होत्या ते सायकलीवर यायचे तर बाकी पोर पोरी दोन तीन किलोमीटर पायी यायचे.शाळा दहा वाजता भरायची पण आम्ही सगळे घरून आठ, साडे आठलाच निघायचो.मस्त पैकी टवाळक्या करत कसे बसे शाळेत दहा पर्यंत पोहचायचो.रोज बर्याच जणांना उशीर व्हायचा. गुरुजीपण काय बोलायचे नाही हा कधी कधी पट्टीने मारायचे .गावातले पोर आम्ही काय फरक पडायचा नाही आम्हाला. पण आम्ही सगळे चिमुकले २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला मात्र आमच्या प्रिय झेंड्याच्या दिवशी सकाळी सातला शाळेत हजर असायचो.सगळे पोर पोरी टाप टीप असायचो ,सर मॅडमची नियोजनाची गरबड चालू असायची, वातावरण कस एकदम सात्विक असायचं,देशप्रेमाने मन उभारून गेलेले असायचे. झेंड्याच्या दिवशीच्या आठवणी आज देखील रोमांच उभा करतात.
“माझं पाकीट रूमवर राहिलंय तेवढं नाश्त्याचे बिल दे. रूमवर गेलो कि लगेच देतो” एखादा भुरटा...
महारष्ट्राचं राजकारण तीन ठिकाणावरून चालतं ,एक शिक्षण संस्था ,दुसरं साखर कारखाने आणि तिसरं जिल्ह्याच्या सहकारी बँका.राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष या तिन्ही ठिकाणी मजबूत आहेत.त्या प्रमाणात भाजप आणि शिवसेना कमजोर आहेत.ह्या पक्षांच्या नेत्यांकडे ना शिक्षण संस्था आहेत ना कारखाने.भाजपने डायरेक्ट काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेतेच त्यांच्या पक्षामध्ये घेतले त्यामुळे त्यांना ह्या संस्थासाठी वेगळी मेहनत करावी लागली नाही.भाजपाकडे आपोआप बऱ्याच संस्था आल्या.शिवसेना मात्र या खेळात मागे पडली आहे .त्या मुळेच शिवसेना मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना संस्था उभा करण्याचे आदेश दिलेत.
महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. महिला आज आत्मविश्वासाने वावरतात पण यासाठी सुरवातीच्या अनेक महिलांना खूप...