MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

मी तीस वर्षात जेवढा शिकलो नाही तेवढं एकट्या झुंडने शिकवले.

नागराज मंजुळे यांचा पहिला हिंदी चित्रपट “झुंड” येत्या चार मार्चला प्रदर्शित होत आहे. सैराट नंतर नागराज मंजुळे कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. झुंड प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करतो का नाही हे चार मार्च नंतर कळेल. सुपरस्टार आणि परफेक्टनिस्ट अमीर खानला मात्र झुंड एक नंबर वाटला आहे. माझ्या तीस वर्षाच्या करियर मध्ये मी बघितलेला बेस्ट चित्रपट आहे “झुंड” असं त्याने चित्रपट बघितल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अमीर खानसाठी झुंडच खास प्रीमियर ठेवलं होत..

कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याचे प्रीमियर भरवले जातात. प्रीमियर भरवण्यामागे हा उद्देश असतो कि चित्रपट बनवणाऱ्या लोकांना चित्रपट दाखवला जातो त्यातून निर्मात्याला आणि दिग्दर्शकाला आपला चित्रपट कसा बनला आहे हे कळते. लोक कसा प्रतिसाद देतात हा नंतरचा भाग. नागराज मंजुळे यांनी अमीर खानसाठी झुंडच प्रीमियर ठेवला होता. झुंड बघितल्यावर अमीर खानची प्रतिक्रिया टी सिरीस ( T series ) या युटूने चॅनेल वर पब्लिश केली आहे. झुंड बघितल्यावर अमीर खान म्हणतो , “नागराजने खूप चांगला चित्रपट बनवला आहे. मागच्या वीस- तीस वर्षांपासून मी चित्रपट क्षेत्रात काम करत आहे पण झुंड सारखा चित्रपट आणखी बनला नाही. आमच्या सगळ्यांनाच नागराजने फूटबॉल केला आहे. अमिताभ बच्चन यांनी अनेक चांगले चित्रपट केले आहे पण झुंड त्यांचा बेस्ट चित्रपटांपैकी एक आहे.

डॉ बाबासाहेबांच्या पोस्टरमुळे पहिलेच झुंड चर्चेत होता.

झुंडचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वात जास्त चर्चा झाली ट्रेलरच्या शेवटी दाखवलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पोस्टरची. दर आठवड्याला चित्रपट येत असतात पण आज पर्यंत कोणत्याही चित्रपटात डॉ आंबेडकरांचं पोस्टर दाखवलं नव्हतं. नागराज मंजुळेंनी ते दाखवलं त्यामुळे साहजिक त्याची चर्चा होणारच होती. अनेक लोकांनी नागराज काय दाखवण्याचा पर्यत करत आहे याचा अंदाज लावत लेख लिहले. त्या माध्यमातून झुंडची प्रसिद्धीचं झाली. आणि आता अमीर खान सारखा नट म्हणत आहे कि झुंड बेस्ट चित्रपट आहे त्यामुळे लोकांमध्ये झुंडची उत्सुकता वाढली आहे. येत्या चार मार्च नंतरच आपल्याला कळेल कि झुंड कसा आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.