आज अभिनेता जॉन अब्राहमचा ४९ वा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर त्याचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. जॉन अब्राहमने बॉलिवूड मध्ये आज १८ वर्ष पूर्ण केली आहेत. त्याची कारकीर्द मोठी आहे पण या सगळ्यांची सुरवात कशी झाली हे खूप लोकांना माहित नाही. आजचा हा किस्सा आहे जॉनच्या पहिल्या चित्रपटाचा. तर जाणून घेऊ जॉनला कसा मिळाला पहिला चित्रपट.
दमदार अभिनय आणि वेगळ्या पर्सनॅलिटीने जॉन अब्राहम ने स्वतःची एक वेगळी प्रतिमा बनवली आहे. जॉन अब्राहमने आता पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेषक आणि समीक्षांची मने जिंकली आहेत. जॉन अब्राहमचा जन्म १७ डिसेंबर १९७२ ला केरळ मध्ये झाला होता. बॉलिवूड मध्ये यायच्या आधी जॉन अब्राहम मॉडेल म्हणून काम करायचा.
चित्रपट आणि मॉडेलिंग करण्याचा अगोदर जॉन अब्राहम एका जाहिरात कंपनी मध्ये काम करत होता. जाहिरात कंपनीमध्ये जॉनला महिन्याला १३,८०० रुपये मिळायचे. जाहिरात कंपनीमध्ये काम करत असताना जॉनने मॉडेलिंग मध्ये आपले काम चालूच ठेवले होते. थोड्याच दिवसात जॉन अब्राहमने मॉडेलिंग मध्ये त्याची एक ओळख बनवली. जॉनचे मॉडेलिंगचे काम बघूनच दिग्दर्शक महेश भट जॉन अब्राहमच्या संपर्कात आले होते.
दिग्दर्शक महेश भट त्यांच्या जिस्म चित्रपटासाठी अभिनेता शोधत होते. महेश भट यांना जिस्म चित्रपटासाठी संजय दत्त सारखा पण नवीन अभिनेता हवा होता. जॉन अब्राहम आणि महेश भट यांची एका शूटिंग दरम्यान भेट झाली. जॉनची संजय दत्त सारखी असलेली पर्सनॅलिटी आणि जॉनने या आधी कुठल्याही चित्रपटामध्ये काम केले नसल्यामुळे दिग्दर्शक महेश भट यांनी जिस्म चित्रपटासाठी जॉन अब्राहमला ऑफर दिली. जॉन अब्राहमने महेश भट यांची ऑफर लगेच स्वीकारली आणि जॉनला त्याचा पहिला चित्रपट मिळाला.
संजय दत्त सारखी पर्सनॅलिटी आणि मॉडेलिंग मधील अनुभवामुळे जॉन अब्राहमला त्याचा पहिला चित्रपट जिस्म मिळाला. जिस्म मध्ये जॉन अब्राहम सोबत अभिनेत्री बिपाशा बसू देखील होती. २००३ मध्ये जिस्म प्रदर्शित झाला. जिस्म सिनेमा नंतर जॉनने कधीही मागे वळून बघितले नाही. जिस्म नंतर साया, पाप ,एतबार, लकीर सारखे चित्रपट जॉनने केले.
यश चोप्रा निर्मित ‘धूम’ मधून जॉन अब्राहमला बॉलिवूड मध्ये खरी ओळख मिळाली. जॉन अब्राहमने धूम मध्ये केलेल्या चोराच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. ‘धूम’ मधील चोर हिरो पेक्षा जास्त प्रसिद्ध झाला होता. यानंतर जॉनला ऍक्शन हिरो म्हणून प्रसिद्धी मिळाली. जॉनच्या शरीर यष्टीचे तर खूप चाहते आहेत. बुलेट उचलेला जॉन सगळ्यांच्या नजरेसमोर कायम असतो. धूम नंतर जॉनने गरम मसाला, टॅक्सी नं. 9211, दोस्ताना, न्यूयार्क, मद्रास कॅफे ,सत्यमेव जयते आणि मुंबई सागा चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. अठरा वर्षाच्या करिअर मध्ये अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. जॉनला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
हे खास आपल्यासाठी
धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे का बघितला पाहिजे ?
जॉनी लिवरला वेळ नसायचा तेव्हा त्याचा डुप्लिकेट जॉनी निर्मल पिक्चर पूर्ण करायचा
फक्त बापालाच विश्वास होता त्याच्या मुली जगातल्या सर्वोत्तम टेनिसपटू आहेत