कोरोनामुळे अनेक बिग बजेट चित्रपट पुढे ढकलले गेले. लॉकडाउन आधी पुष्पा आला आणि धुमाकूळ घालून गेला. त्यामुळे दक्षिणेच्या अनेक निर्मात्यांना मार्केटचा अंदाज आला आणि त्यांनी तामिळ तेलुगू बिग बजेट पिक्चर हिंदीत रिलीज करायचा निर्णय घेतला आहे. काहीचित्रपटांची आधीच घोषणा झाली होती तर काही चित्रपटांना पुष्पाचे यश बघून संपूर्ण भारतात रिलीज करण्याचा निर्णय घेतला. तर बघूया येणारे साऊथ चित्रपट कोणते आणि ते कधी रिलीज होणार.
वलीमाई

तमिळ सुपरस्टार अभिनेता अजित कुमारचा बहुप्रतिक्षित वलिमाई 14 जानेवारीला पोंगल सणाच्या मुहूर्तावर पडद्यावर येणार होता. तथापि कोविड संसर्गाची तिसरी लाट सुरू झाल्याने निर्मात्यांच्या योजना बिघडल्या. बोनी कपूर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट संपुर्ण भारतात रिलीज करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. अजूनही अधिकृत कधी रिलीज होणार हे सांगता येणार नाही पण चित्रपट क्षेत्रातील अनेकांना हा पिक्चर फेब्रुवारी मध्ये रिलीज होईल अशी खात्री आहे. अनेक राज्यात निर्बंध शिथिल होत आहेत त्यामुळे २४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.
RRR

RRR च्या निर्मात्यांनी यापूर्वी दोन रिलीज तारखा पुढे ढकलल्या आहेत. ७ जानेवारीला चित्रपटगृहात हा पिक्चर दिसेल अशी अपेक्षा होती पण लॉकडाउनच्या नियमावलीमुळे निर्मात्यांनी अनिश्चित काळासाठी ही तारीख पुढे ढकलावी लागली. पुन्हा निर्बंध शिथिल होत असताना १८ मार्च आणि २८ एप्रिल यापैकी एका तारखेला चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित केला जाईल असा निर्मात्यांचा विचार चालू होता. जेम्स चित्रपट १७ मार्च रोजी एकमेव रिलीज होणार होता आणि एप्रिलच्या अखेरीस बॉक्स ऑफिसवर इतर मोठ्या चित्रपटांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने २५ मार्चला चित्रपट रिलीज करणे हा एक चांगला पर्याय होता. दोन वर्षांपासून हा चित्रपट सिनेमागृहाची वाट बघतोय. बाहुबलीच्या यशानंतर राजमौली कडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. यावर्षीचा हा सगळ्यात मोठा चित्रपट असेल.
बिस्ट

विजय हा दक्षिणेतला पुढचा रजनीकांत मानला जातो. तमिळ सुपरस्टार विजयच्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट अद्याप निश्चित झालेली नाही. तथापि निर्मात्यांनी आधीच जाहीर केले आहे की तो एप्रिलमध्ये पडद्यावर येईल. चर्चा अशी आहे की तो एकतर १४ एप्रिल किंवा २८ एप्रिलला रिलीज होईल. चित्रपट आता पोस्ट-प्रॉडक्शन टप्प्यात आहे. रिलीजच्या तारखेबाबत अधिकृत सूचना लवकरच येईल अशी अपेक्षा आहे. २०२० मधील मास्टर हा विजयचा सुपरहिट सिनेमा होता. हा चित्रपट दक्षिणेपुरता रिलीज होणार कि पूर्ण भारतात हे अजून समजले नाही.
KGF: Chapter 2

यश स्टारर चित्रपटाचे निर्माते त्यांच्या रिलीज प्लॅनमध्ये बदल करण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीत. आधी जाहीर केल्याप्रमाणे हा चित्रपट १४ एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अगोदरच या चित्रपटाचा टीजर येऊन दीड वर्षे झालीत. निर्मात्यांना हे चित्रपट सिनेमागृहातच रिलीज करायचा आहे त्यामुळे निर्माते देखील वाट पाहून आहेत कधी एकदाचे सिनेमागृह पूर्ण क्षमतेने सुरु होणार. यशचा आणि संजय दत्त यांची जुगलबंदी बघण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
जेम्स

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अकाली मृत्यूपूर्वी पुनीत राजकुमारचा हा शेवटचा चित्रपट होता. दिवंगत मूव्ही आयकॉनला श्रद्धांजली म्हणून कन्नड चित्रपट उद्योगाने जेम्ससह इतर कोणतेही चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आजूबाजूचे उद्योगही त्याचे अनुकरण करतील असा विश्वास आहे. जेम्स १७ मार्च रोजी सिनेसृष्टीत येण्याची शक्यता आहे ही पुनीतची जयंती देखील आहे. मूळ कन्नड चित्रपट तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंद भाषेतही प्रदर्शित होणार आहे. पुनीतचा शेवटचा हा चित्रपट कन्नड चित्रपट चाहत्यांसाठी एक भावनिक गोष्ट आहे.
राधे श्याम

प्रभासने बाहुबली नंतर बॉलीवूडमध्ये ग्रँड एन्ट्री मारली. त्यामुळे प्रभासचा प्रत्येक चित्रपट पॅन इंडिया रिलीज होणार असंच दिसतंय. बाहुबलीच्या यशानंतर प्रभासने एक ऍक्शन चित्रपट केला त्यानंतर आता प्रभास लव्ह स्टोरी घेऊन आला आहे . थोडी हटके हि प्रेम कथा असणार आहे. निर्मात्यांनी ११ मार्चला सिनेमागृहात हा चित्रपट रिलीज करण्याचा विचार केला आई.
हे खास आपल्यासाठी
धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे का बघितला पाहिजे ?
जॉनी लिवरला वेळ नसायचा तेव्हा त्याचा डुप्लिकेट जॉनी निर्मल पिक्चर पूर्ण करायचा
फक्त बापालाच विश्वास होता त्याच्या मुली जगातल्या सर्वोत्तम टेनिसपटू आहेत