MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

इंग्लिश जोकर खूप बघितले आपल्या मातीतला जोकर आपण कधी समजून घेणार

जोकर (जोक्विन फिनिक्स), बॅटमॅन- डार्क नाईट (हेथ लेजर) आणि मेरा नाम जोकर (राज कपूर) सामाजिक परिस्थितीने निर्माण झालेले हे तीन जोकर.

जगाच्या दृष्टीने विचित्र पात्र. या तीनही जोकरचं समाज स्थान नाकारतो. म्हणून पहिले दोन जोकर जगाला धडा शिकवण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी प्रतीकात्मक जोकर या खलनायकाच्या रुपात चित्रपटात वावरतात. या दोन्ही जोकरला सत्ता मिळवणे किंवा पैसा मिळवणे हा हेतू नाही तर जगाला त्यांचं अस्तित्व मान्य करायला लावणं हाच त्यांचा मुख्य हेतू आहे. पण मेरा नाम जोकर मधला ऋषी कपूर ने साकारलेला सोळा सतरा वर्षाचा राजू जोकर जेव्हा जोकरच्या वेशभूषेत रस्त्यात पत्रके वाटत असतो, हे बघून पालक त्याची तक्रार करतात आणि त्याला शाळेतून काढलं जातं. जोकरच काम किंवा रस्त्यावर असं काहीतरी करणं त्यावेळी आणि आजही कमी दर्जाचे मानलं जातं. उच्च वर्गाच्या साच्यात त्याचं हे काम बसत नव्हतं, या गोष्टीचा राग येऊन त्याने शारीरिक किंवा शाब्दिक हिंसेने उत्तर दिले नाही. तो विसरून गेला. त्याच्यातल्या जोकरशी तो प्रामाणिक राहून लोकांना हसवत राहिला. प्रत्येक टप्प्यावर लोकांनी दुःख देऊन सुद्धा त्यांच्याबद्दल आकस न ठेवता तो त्यांच्यावर प्रेमच करत राहिला

mera-naam-jocker-review-in-marathi

जोकर (जोक्विन फिनिक्स), बॅटमॅन- डार्क नाईट (हेथ लेजर) आणि मेरा नाम जोकर (राज कपूर) सामाजिक परिस्थितीने निर्माण झालेले हे तीन जोकर.

जगाच्या दृष्टीने विचित्र पात्र. या तीनही जोकरचं समाज स्थान नाकारतो. म्हणून पहिले दोन जोकर जगाला धडा शिकवण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी प्रतीकात्मक जोकर या खलनायकाच्या रुपात चित्रपटात वावरतात. या दोन्ही जोकरला सत्ता मिळवणे किंवा पैसा मिळवणे हा हेतू नाही तर जगाला त्यांचं अस्तित्व मान्य करायला लावणं हाच त्यांचा मुख्य हेतू आहे. पण मेरा नाम जोकर मधला ऋषी कपूर ने साकारलेला सोळा सतरा वर्षाचा राजू जोकर जेव्हा जोकरच्या वेशभूषेत रस्त्यात पत्रके वाटत असतो, हे बघून पालक त्याची तक्रार करतात आणि त्याला शाळेतून काढलं जातं. जोकरच काम किंवा रस्त्यावर असं काहीतरी करणं त्यावेळी आणि आजही कमी दर्जाचे मानलं जातं. उच्च वर्गाच्या साच्यात त्याचं हे काम बसत नव्हतं, या गोष्टीचा राग येऊन त्याने शारीरिक किंवा शाब्दिक हिंसेने उत्तर दिले नाही. तो विसरून गेला. त्याच्यातल्या जोकरशी तो प्रामाणिक राहून लोकांना हसवत राहिला. प्रत्येक टप्प्यावर लोकांनी दुःख देऊन सुद्धा त्यांच्याबद्दल आकस न ठेवता तो त्यांच्यावर प्रेमच करत राहिला

बालपण शिल्लक असताना तारुण्य खुणावणाऱ्या वयात प्रेम होतं तेही शिक्षिकेवर.

अशा नात्याचं अश्लील वर्णन बहुतेकांनी ऐकलं असेलच. पण वयात येणाऱ्या मुलांच्यात होणारा शारीरिक आणि मानसिक बदल कोणाला समजून घ्यावासा वाटत नाही. अशावेळी चित्रपटात शिक्षिकेचा होणारा नवरा नायकाची घालमेल समजून घेतो. त्या वयातील त्याचं तसं वागणं तो मान्य करतो. एवढंच नाही तर तो त्याला प्रेम व्यक्त करण्याची संधी पण देतो. पत्नीबद्दल त्याला असुरक्षित वाटत नाही. पत्नीवर तो सोडून दुसरा पुरुष प्रेम करतोय हे त्याला माहीत असूनही त्या पुरुषाबरोबर तो सहजपणे वावरतोय.

चित्रपटाचा नायक एकदा आपल्या डोक्यात शिरला की त्याच्या आसपासच्या व्यक्तिरेखा आपण दुर्लक्षित करतो. त्याच हिशोबाने पहिल्या भागातील शिक्षिकेचा होणारा नवरा हे पात्र साकारणाऱ्या नटाने त्या भागापुरता नायका इतकीच महत्त्वाची भूमिका वठवली आहे. राजूचं पहिलं प्रेम यशस्वी होण्यासारखी परिस्थिती चित्रपटात दिसत नाही. पण त्या माध्यमातून पौगंडावस्थेतील मुलांमधील होणारा बदल अचूक टिपला आहे. शिक्षिका पाण्यात पडल्यानंतर तिच्या उघड्या मांड्याकडे पाहणारा राजू. कपडे बदलताना चोरून पाहणारा तोच राजू. नंतर मात्र शिक्षिकेला असं पाहणं अपराधी वाटणं, मग चर्चमध्ये जाऊन माफी मागणं, हा सगळा प्रसंग या वयातील कोणत्याही मुलाला न्याय देईल असा आहे. पण म्हणून हे प्रेम नाही असं म्हणता येणार नाही. जोकरची बाहुली शिक्षिकेला भेट देताना तो स्वतःला तिच्याकडे सोपवत असतो. तिला हे लक्षात येतं म्हणून जाताना ती त्याची जोकरची बाहुली त्याला परत देते. इथं त्याचं प्रेम नाकारलं किंवा धोका दिला अस अजिबात नाही. त्याच्यातला दुःखी, निराश, हताश, अस्तित्वाला त्याच्यातला जोकरच फक्त सोबत देऊ शकतो ही जाणीव करून दिली. इथून पुढे खऱ्या अर्थाने जोकरच्या लालभडक चेहऱ्या पाठीमागे लपलेला तुमच्या आमच्या सारखा माणूस जोकर हेच जगण्याचं वास्तव मान्य करून जगायला शिकला.

आईच्या औषधासाठी चोरून सर्कशीत शिरतो.

मैं इंसान हूं काफी नहीं?‘ एका वाक्याने सगळ्यांना विचार करायला भाग पाडतो. इथूनच वास्तवात जोकरच आयुष्य स्वीकारलेला राजू सर्कशीतला जोकर म्हणून लोकांपुढे कला सादर करायला लागतो. सर्कशीतल्या जोकरची भूमिका त्यानं स्वतःपासून कधी दूर केली नव्हतीच. ‘मजहब है अपना हंसना हंसाना’ हे तत्व त्यानं आधीच मान्य केलं होतं. दरम्यान विदेशी कलाकाराच्या तो प्रेमात पडतो. दोघांची भाषा एकमेकांना कळत नसल्याने डिक्शनरी घेऊन संभाषण करताना पाहून रोमँटिक वाटतं. पहिल्या प्रेमासारखं हे एकतर्फी नसतं. म्हणून जोकरची बाहुली भेट देताना त्याला आयुष्यभराच्या सोबतीची खात्री वाटते. त्यात राजुच्या आईने होणाऱ्या सूनेसाठी पाहिलेलं स्वप्न, सगळं सुखावणारं होतं. पण सुखाची भुरळ दुःखाला जास्त तीव्रता देऊन जाते. आईच स्वप्न पूर्ण होणार नाही ही कल्पना राजुला येते. यासाठी तो मन तयार करत होताच, आणि अचानक ऐन सर्कस चालू असताना प्रेक्षकांमध्ये बसलेली त्याची आई मरण पावते.

आईचं प्रेत समोर असताना लोकांपुढे जोकर येण्याची वेळ झाली.

असा आवाज कानावर येतो. दुःख व्यक्त करण्याइतका सुद्धा वेळ त्याला मिळत नाही. कलाकाराची बांधिलकी प्रेक्षकाच्या मनोरंजनाची असते ही जाणीव सर्कशीचा मालक(धर्मेंद्र) करून देतो. कुत्ते-कमिने स्टाईल मध्ये ऐकायची सवय असलेला धर्मेंद्र अतिशय शांत नम्र स्वरात संवाद करत असतो तेव्हा त्याचा अभिनय खरंच भावतो. जोकर चेहऱ्यावर रंगवुन पुन्हा प्रेक्षकांपुढे हजर राहणारा राजू लोकांना त्यांच्या अपेक्षा इतकाच हसवतो. याप्रसंगी तो चार-पाच वेळा ‘मां.. मां’ आर्त हाक देतो. हा विचित्र भावनिक प्रसंग आहे. त्याला पाहून समोर हजारो पब्लिक हसतय, पण हसवणारा प्रचंड दुःखात आहे. त्याच्या आईला राजूने जोकर व्हावं असं कधीच वाटत नव्हतं. आणि त्याच जोकर पायी आई जीव सोडते ही अपराधी भावना सर्कशीत त्याला काम करू देणार नव्हती. त्यानं सर्कस सोडली; पण जोकरने त्याला सोडलं नाही. सगळं संपलं या विचाराने तो जोकर ची बाहुली समुद्रात फेकून देतो. पण एक कुत्र ती बाहुली उचलून पुन्हा त्याला आणून देतं, हा अतिशय मार्मिक प्रसंग आहे. जोकरच काम करणं त्यांना सोडलं होतं पण नशीब परत परत सांगत होतं की हा जोकरच तुझं खरं अस्तित्व आहे.

पुरुषी नजरेपासून स्वतःला वाचवण्यासाठी पुरुषाच्या वेशभूषेत तिच्या लाडक्या कुत्र्या सोबत फिरणारी मीना.

ही राजूच्या आयुष्यातील तिसरी व्यक्ती. मीना आणि राजूची भेट पहिल्यांदा होते तेव्हा कुत्र्यासाठी राजुवर ओरडणारी मीना पुढच्या काही वर्षात त्याच कुत्र्याला महानगरपालिकेची गाडी उचलून घेऊन जाते, तेव्हा मीनाला अजिबात सुख-दुख वाटत नाही. राजुला वाईट वाटतं. गरजेनुसार प्रेम करणं त्याला पटत नव्हतं. त्याची संवेदनशीलता प्रत्येक परिस्थितीबद्दल, त्या परिस्थितीत असणाऱ्या माणसांबद्दल आणि प्राण्यांबद्दल सुद्धा समान होती. भूतकाळात नको झालेल्या गोष्टी पुन्हा येतील याची भीती सतत वाटत असते. म्हणून या वेळेस तो जोकरची बाहुली मीनाला देत नाही. पण मीना स्वतःहून ती बाहुली हृदयाजवळ घेते तेव्हा पुन्हा निराशेचा भूतकाळ डोकावत तर नाही ना याची भीती वाटायला लागते. प्रसिद्धी आणि पैसा झोपडीत राहणार्या मीनाच्या विचारात बदल आणतोय हे राजूला जाणवतं. एक दिवस कायमची दूर जाईल याची पण त्याला कल्पना येते. पण तरी तो पुरुषी अहंकारात एखाद्या स्त्रीवर आपला मालकी हक्क असल्याच्या आवेशात तिची लायकी काढण्यासारखं स्वस्त वर्तन करत नाही. किंवा छपरी आशिक सारखं धमकी देऊन तिचा नाईलाज करत नाही.

त्याच खरच प्रेम होतं म्हणून तिच्या स्वप्नांच्या मध्ये तो अडथळा बनला नाही.

यशाच्या शिखरावर पोहोचलेली मीना झोपडीत धूळखात पडलेली जोकर ची बाहुली विसरून जाते, तेव्हा राजू त्या जोकर कडे बघत ‘जीना यहां मरना यहां’ तत्त्व आठवत ‘इस दुनिया में समझदार की मौत होती है’ स्वतःला आणि दुनियेला सांगतो. तरी हा जोकर त्याचा खेळ अर्ध्यावर सोडत नाही. आयुष्याच्या शेवटच्या खेळाला तयार होतो. शेवट नॉट पॉझिटिव्हली असं लिहिलं असलं तरी तो पॉझिटिव्ह नसता तर या शेवटच्या जोकरच्या खेळासाठी कधीच तयार झाला नसता.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.