जगभारत वेग वेगळे देश आहेत, वेग वेगळ्या संस्कृती आहेत. वेगळी संस्कृती आली कि सण पण वेगळे आलेच. पण सगळी कडे एक समान सण उत्सव आढळतो , सर्वच देशातल्या लोकांनी त्या सणाला उत्सवाला आपलं मानलं आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल मी कशा विषयी बोलत आहे. वॅलेंटाईन डे अन आणखी दुसरं काय.
असं म्हणतात, प्रेम, एक अशी भावना जी व्यक्त होताच चेहरा खुलतो, बहर येतो. तसं बघितलं तर प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी कुठल्याही ठराविक वेळेची, जागेची, गरज नसते. 365 दिवस हे प्रेमाचेच असतात पण व्हॅलेंटाइन डे की बात ही कुछ और है !
प्रेम करणारे सर्व प्रेम वीर वॅलेंटाईन डे आणि वीक मोठ्या जल्लोषात साजरा करतात. पण वॅलेंटाईन डे कसा सुरु झाला याचा किस्सा खूप दर्दनाक आहे. वॅलेंटाईन नावाच्या संताला फासावर जायला लागलं.
एका जोडप्याचे लग्न लावले म्हणून वॅलेंटाईन जेल मध्ये गेला पण प्रेम करायचे सोडले नाही.
रोम नावाच्या राज्यामध्ये वॅलेंटाईन राहायचा. केलेडियस द्वितीय रोमवर राजा होता. केलेडियस द्वितीय खूप नैराश्य असलेला राजा होता. प्रेम करणं त्याला मूर्खपणा वाटायचं , प्रेम करणारे लोक त्याला अडवत नसतं. रोम राज्यात जो कोणी प्रेम करेल , प्रेम विवाह करेल त्याला शिक्षा होती. प्रेम विवाह करणाऱ्याला आणि करून देणार्याला शिक्षा आहे माहिती असून देखील संत वॅलेंटाईनने एका जोडप्याचे लग्न लावून दिले. लग्न लावून दिल्यामुळे संत वॅलेंटाईनला जेल मध्ये जावे लागले.
जेल मध्ये गेल्यावर संत वॅलेंटाईनचा प्रेमावरचा विश्वास उतरून जाईल असं केलेडियस द्वितीयला वाटलं होत. पण जेल मध्ये एकदम उलटं घडलं. जेल मधल्या एक तरुणीवर वॅलेंटाईनला प्रेम झाले. वॅलेंटाईनने त्याचं प्रेम लपवून ठेवले नाही. सर्वाना त्याच्या प्रेमाची कल्पना दिली. केलेडियस द्वितीयला हि गोष्ट कळल्यावर त्याने वॅलेंटाईनला फाशीची शिक्षा सुनावली. १४ फेब्रुवारी हा दिवस फाशी साठी निवडला गेला.
ठरल्याप्रमाणे १४ फेब्रुवारीला रोमच्या राजधानीत फाशी देण्यात आली. प्रेम केले म्हणून वॅलेंटाईनला फासावर जावे लागले. राजा केलेडियस द्वितीय जरी प्रेम विरोधी असला तरी जनतेला मात्र वॅलेंटाईनच्या त्यागाची कल्पना होती. त्यामुळे वॅलेंटाईनच्या आठवणीत रोम मध्ये लोक १४ फेब्रुवारीला वॅलेंटाईन दिवस साजरा करायला लागले. केलेडियस द्वितीयचा निषेध करण्यासाठी रोम मधील जनता प्रेम व्यक्त करायला लागली . तेंव्हापासूनच वॅलेंटाईनडे ची सुरुवात झाली.
आपल्याकडे एक म्हणं आहे क्रांती बलिदान मागते पण फक्त क्रांतीच बलिदान नाही मागतं. प्रेम देखील बलिदान मागते. आपल्यासाठी संत वॅलेंटाईनें बलिदान दिलं आहे. त्यामुळे आपण संत वॅलेंटाईनच्या बलिदानाची कदर केली पाहिजे. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीवर प्रेम केलं पाहिजे. मराठी मिररचा तुम्हाला हैप्पी वॅलेंटाईन डे.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?