आपण सगळेच जण रेल्वेने प्रवास करतो कधी जनरलने तर कधी स्लिपरने. गर्दी सोडली तर फार मोठा फरक आपल्याला जाणवत नाही जनरल आणि स्लिपर कोच मध्ये. पण पूर्वी असं नव्हत.जनरल डब्ब्यांमध्ये लाकडी आसने असायची तर स्लिपरमध्ये गाद्याची आसने असायची .हा भेदभाव कमी करायचा असा प्रणच आपल्या अहमदनगरच्या प्रोफेसरने घेतला होता .तो भेदभाव त्यांनीच कमी केला केला.जनरल डब्ब्यात पण गाद्या आणल्या. हे झालं कारण तो प्रोफेसर देशाचा रेल्वे मंत्री झाला.प्रोफेसर मधू दंडवते त्यांचं नाव.
मधू दंडवतेँचा इतिहास.
महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यात १९२० च्या २१ जानेवारीला मधू दंडवतेंचा जन्म झाला.जसे शाळेत जायला लागले शाळेत फक्त स्वतंत्र ,चालवळी ,महात्मा गांधी यांच्याच चर्चा त्यांच्या कानी यायच्या .साहजिकच दंडवते यान सर्व चर्चांकडे आकर्षीत झाले आणि ओळख झाली महात्मा गांधी यांच्या विचाराची.गांधी आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देत आहेत.त्यामुळे आपण गांधीजींची साथ दिली पाहिजे.या विचाराने दंडवते खूप कमी वयात काँग्रेस साठी काम करू लागले.पण जसे जसे वय वाढत जाऊ लागले यांचे विचार प्रगल्भ होत गेले.काँग्रेसचा विचार देशाला स्वतंत्र मिळवून देईल पण आपल्याला देश खर्या अर्थाने पुढे न्यायाच असेल तर आपल्याला समाजवादी दिशेने वाटचाल करावी लागेल अशी त्यांची धारणा झाली .काँग्रेस मधेच काम करणाऱ्या अश्या नेत्यांनाच एक गट तयार झाला होता.मधू दंडवते त्यांच्या समूहात सहभागी झाले.राम मनोहर लोहिया त्या सर्वानाचे नेते होते.स्वतंत्र्यच्या नंतर पण मधू दंडवतेंनी समाजवादी विचारानेच आपला प्रवास चालू ठेवला.
मधू दंडवतेंचा राजकीय प्रवास.
सुरुवातीच्या काळात संघटनेमध्ये काम केल्यावर समाजवादी पक्षाने त्यांना संसदीय राजकारणात आणले.१९७० च्या महाराष्ट्र विधानपरिषेद निवडणुकीत मधू दंडवते आमदार झाले.पण आमदारकी त्यांच्या कडे फक्त एकच वर्ष राहिली कारण १९७१ ला कोकणातल्या राजापूर मतदार संघातून खासदार झालेले ‘पै’ यांचं अकाली निधन झालं आणि ती जागा खाली झाली.राजापूरच्या जागा मधू दंडवतेंनी लढवावी असा आदेश जनता पक्षाने काढला आणि दंडवतेंना आमदारकीचा राजीना देऊन खसदारकीची निवडणूक लढवावी लागली.ती निवडणूक दंडवते मोठ्या फरकाने जिंकले.तेंव्हा पासून दंडवते राजापूर मतदार संघातून सहा वेळेस जिंकून गेले.१९९१ च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या सुरेश प्रभू कडून दंडवतेंना पराभवाचा सामना करावा लागला.जनता दल आणि व्ही पी सिंग यांच्या मंत्रिमंडळात दंडवते मंत्री देखील राहिले आहेत.
रेल्वे मंत्री असताना कोकण रेल्वेची सुरुवात केली.
१९७७ च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्ष सत्तेत आला.मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.मधू दंडवते यांची रेल्वे मंत्री म्हणून नियुक्ती झाली.रेल्वे मंत्री म्हणून शपथ घेतल्यावर त्यांच्या पुढे पहिली मागणी होती.कोकण रेल्वेची.कोकणात रेल्वे नव्हती.त्यामुळे कोकणी लोकांना प्रवासाची सोय नव्हती.त्यामुळे कोकणातले सर्व प्रतिनिधी कोकण रेल्वेची मागणी करत.मात्र कोकण रेल्वे पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य होणार नाही म्हणून ती मागणी नाकारली जात होती.दंडवते स्वतः कोकणाचे नेतृत्व करत असल्यामुळें त्यांना कल्पना होती कि कोकण रेल्वे किती महत्वाची आहे.कोकण रेल्वे तर करायचीच आहे असा प्रण दंडवतेंनी घेतला होता.पंतप्रधान देसाईना त्यांनी कोकण रेल्वेसाठी तयार केलं आणि ई श्रीधरन याना कोकण रेल्वेचा प्रोजेक्ट दिला.कोकण रेल्वे प्रोजेक्ट सुरु झाला मात्र जनता सरकार दोनच वर्षांमध्ये कोसळले.पुढचे दहा वर्ष दंडवते सत्तेत तुन बाहेर पडले मात्र १९९० ला व्ही पी सिंग यांच्या मंत्रिमंडळात दंडवते परत अर्थमंत्री म्हणून परत सत्तेत आले.अर्थमंत्री झाल्यावर दंडवतेंनी कोकण रेल्वेसाठी मोठी मदत केली.कोकण रेल्वेमुळे आज लाखो लोकांना फायदा होत आहे.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?