संगीत, सूर आणि नमाज यांमध्ये त्यांना कोणताही फरक जाणवत नसे. ते मंदिरातही शहनाई वाजवत असत आणि सरस्वतीचे सच्चे अनुयायी देखील होते. गंगा नदीची तर त्यांना अफाट ओढ होती. दिवसात पाचवेळा नमाज पढायचे, जकात द्यायचे आणि हज यात्रेलाही जायचे. पण कधी कधी सनईवादनात ते इतके तल्लीन होत, की बऱ्याचदा नमाजही विसरून जात असत. संगीत कुठल्याही नमाज किंवा प्रार्थनेपेक्षा सर्वोच्च आहे. संगीताबद्दल त्यांचे हे प्रेम श्रोत्यांना त्यांच्या जवळ आणत असे आणि एकदा का त्यांना ऐकलं कि प्रत्येक जण आयुष्यभर त्यांचा श्रोता होऊन जात असे. मी कोणाबाबदल बोलत आहे हे तुम्हाला समजले असेलच आतापर्यंत. सनईवादक बिस्मिल्ला खान .! आज २१ मार्चला बिस्मिल्ला खान यांची जयंती आहे.
नेहरूंच्या विनंतीवरून स्वातंत्र्य दिनी शहनाईवादन
1947 साली ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी पंडित नेहरूंना वाटलं या क्षणी बिस्मिल्ला खान यांची सनई वाजली पाहिजे. स्वातंत्र्यदिनाच्या समारंभाच्या आयोजनाचं काम पाहणारे संयुक्त सचिव बद्रुद्दीन तैयबजी यांच्याकडे जबादारी देण्यात आली की, बिस्मिल्ला खान यांना सोधायचं आणि दिल्लीत कार्यक्रमसाठी आमंत्रित करायचं. बिस्मिल्ला खान त्यावेळी मुंबईत होते. त्यांना विमानाने दिल्लीत आणलं गेलं आणि सुजान सिंह पार्क येथे राजकीय पाहुणे म्हणून त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली. स्वातंत्र्यदिनाला सनई वाजवण्याबाबत बिस्मिल्ला खान उत्सुक होतेच. मात्र, लाल किल्ल्यावर चालत सनई वाजवू शकणार नसल्याचं त्यांनी नेहरूंना सांगितलं. त्यावेळी नेहरू म्हणाले, “तुम्ही एखाद्या सर्वसाधारण कलाकारासारखं चालायचं नाही. तुम्ही पुढे चालाल आणि तुमच्या मागून मी आणि संपूर्ण देश चालेल.”
बिस्मिल्ला खान आणि त्यांच्या साथीदारांनी सनई वादनातून स्वतंत्र भारताच्या पहाटेचं स्वागत केलं. 1997 साली भारताच्या ५० व्या वाढदिवसाला म्हणजेच स्वातंत्र्यांचा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा करताना देखील लाल किल्ल्यावर बिस्मिल्ला खान यांनी सनई वादन केलं होतं.
आयुष्यभर बेगम अख्तर यांचे चाहते होते बिस्मिल्ला खान
1930 च्या दशकात कोलकात्यात पार पडलेल्या एका संगीत संमेलनामुळे बिस्मिल्ला खान यांना पहिल्यांदा प्रसिद्धी मिळाली. या संमेलनाचं बिहारमधील भूकंपग्रस्तांच्या मदतनिधीसाठी आयोजन करण्यात आलं होतं. याच कोलकत्याच्या संमेलनातून बेगम अख्तर यांनीही आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर बिस्मिल्ला खान आणि बेगम अख्तर हे एकमेकांचे शिष्य बनले. उन्हाळ्याच्या दिवसात घडलेली एक गोष्ट सांगितली जाते. बिस्मिल्ला खान यांना रात्री झोप लागत नव्हती. त्यावेळी रस्त्याच्या पलिकडे एक महिला ‘दिवाना बनाना है… तो दिवाना बना दे…’ हे गाणं गात होती. बिस्मिल्ला खान ते गाणं ऐकत बसले. बिस्मिल्ला खान यांनी आजूबाजूला विचारलं, तेव्हा कळलं की, ती महिला म्हणजे बेगम अख्तर होत्या ! तेंव्हा पासून बिस्मिल्ला खान आयुष्यभर बेगम अख्तर यांचे चाहते राहिले.
विलायत खान यांच्यासोबतच्या जुगलबंदीला लोकांनी खूप प्रेम दिले.
बिस्मिल्ला खान आणि महान सतारवादक उस्ताद विलायत खान यांच्यात अनोखं नातं होतं. जेव्हा कधी जुगलबंदीची वेळ येत असे, तेव्हा विलायत खान हे बिस्मिल्ला खान यांच्यासोबत सतार वाजवणं पसंत करत. हे दोघे जेव्हा कला सादर करायचं तेंव्हा सर्व जण धुंदीत हरवून जायचे. ह्या दोन खानच्या जोडीला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. एकदा तर विलायत खान यांनी बिस्मिल्ला खान यांच्याबद्दल म्हटलं होतं, “माझा आणि बिस्मिल्लाह खान यांचा आत्मा एकच आहे.”
एक खुर्ची आणि एक पलंग याच्या पलीकडे त्यांच्या कडे काहीही नव्हते.
थंडीच्या काळात बिस्मिल्ला खान अंगणातील पलंगावर बसून, उन्हाचा आनंद घ्यायचे. त्यावेळी त्यांच्या मागे कपडे वाळत घातलेले असायचे. लेखिका जुही सिन्हा यांनी त्यांच्या पुस्तकात लिहले आहे , “बिस्मिल्ला खान यांनी आयुष्यभर स्वत:चे कपडे स्वत:च धुतले. इस्त्री न करताच ते कपडे घालायचे. एक पलंग आणि एक खुर्ची यापलिकडे त्यांच्या खोलीत काहीच नव्हतं. कधीच कार खरेदी केली नाही. रिक्षानेच जात. कधीच दारू प्यायले नाहीत. कधी कधी विल्सची एखादी सिगरेट मात्र ओढत असत.”
उतार वयात बिस्मिल्ला खान वाराणसीतच जास्त राहायचे. वाराणसीवर त्यांचं प्रेम होत. १७ ऑगस्ट २००६ ला बिस्मिला खान यांनी त्यांच्या प्रिय भारत आणि भारतीयांना शेवटचा निरोप दिला. दिल्लीच्या इंडिया गेट वर बिस्मिला खान यानाचा अंतविधी करण्यात आले. बिस्मिला खान यांना आपल्यातून जाऊन १५ वर्षा पेक्षा मोठा काळ झाला आहे. मात्र बिस्मिल्ला खान यांची शहनाई आजही भारतीयांच्या मनात वाजत आहे. आज त्यांची जयंती आहे. मराठी मिरर बिस्मिला खान यांना विन्रम अभिवादन करतं.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?