MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

आपण फेसबुक वापरतो हे खरंय पण सध्या ट्विटरची हवा आहे.

फेसबुक नवीन नवीन आल्यावर सगळे जण फेसबुक वर आले. म्हणजे आपल्याला ओळखीचं जर कोणी फेसबुकवर नसेल तर आपण त्याला फेसबुकवर यायला सांगायचो. हवा होती त्या वेळी फेसबुकची. हवा असणार नाही तर काय ऑर्कूट बंद झालं होतं आणि मार्केट मध्ये दुसरं कोणीही नव्हतं. पण आता मार्केट असं तसं राहील नाही. फेसबुकवर आपण सगळे आज देखील आहोत पण फेसबुकचा तो दरारा राहिला नाही. ट्विटर फेसबुक पेक्षा पुढे निघून गेलं आहे.

मार्केट मध्ये नवे प्लेयर आल्यामुळे फेसबुकचे वापरकर्ते कमी झाले.

जो पर्यंत दुसरे अँप नव्हते तो पर्यंत फेसबुक किंग होत पण नंतर खूप अँप आले. फोटो साठी इंस्टाग्राम आले. त्यामुळे फोटो प्रेमी लोक जास्त वेळ इंस्टाग्रामवर घालवू लागले. जे लोक मॅसेज पाठवण्यासाठी फेसबुक वापरायचे त्या लोकांसाठी व्हाट्स अँप आलं त्यामुळे ते व्हाट्स अँप ला गेले . हा भाग दुसरा आहे कि इंस्टाग्राम आणि व्हाट्स अँप पण फेसबुकचेच आहे. पण जे लोक इंस्टाग्राम आणि व्हाट्स अँपला गेले ते गेले. व्हाट्स अँप आणि इंस्टाग्रामकडे काही जण गेल्यावर फेसबुकवर फक्त पोस्ट लिहिणारे, लेख लिहिणारे, ब्लॉगिंग करणारेच लोक राहिले. नंतरच्या काळात फेसबुकचा वापर व्यवसाय करण्यासाठी देखील होत होता पण तरी देखील लेख आणि पोस्ट लिहण्यासाठी फेसबुक वापरलं जात आहे.

ट्विटर आपला स्पर्धक होऊ शकत हे फेसबुकच्या लक्षात आलं नाही.

ट्विटर मायक्रो ब्लॉगिंगचे माध्यम होते. म्हणजे कमी शब्दात बोलायचं ट्विटरने ग्राहकांना बंधन घातलं होत. फेसबुकच तसं नव्हतं फेसबुकला मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही पण ब्लॉगिंग करता येत होती. कमी शब्दांची मर्यादा ठेवल्यामुळे आपल्याला पद्धशीर मांडावे लागे. पण मायक्रो ब्लॉगिंगचा ट्विटरला फायदा असा झाली कि सरकारी संस्थांनी जनतेला माहिती देण्यासाठी ट्विटरचा वापर सुरु केला. सरकारी संस्था आणि मोठे प्रसिद्ध लोकांनी ट्विटर जॉईन केल्यामुळे सामान्य ग्राहक पण ट्विटर वर त्यांची स्पेस शोधत ट्विटर आले. ट्विटर वर ग्राहक येत असताना फेसबुकने त्यांच्या कडे दुर्लक्ष केले. म्हणजे ट्विटर त्यांचा स्पर्धक होऊ शकतो हे फेसबुकच्या लक्षात आलं नाही.

ब्लॉगिंग ट्विटर कडे गेल्याने फेसबुककडे फक्त व्हिडिओ राहिले.

मायक्रो ब्लॉगिंग वरून मॅक्रोवर जाण्यासाठी ट्विटरने थ्रेड आणले मराठीत त्याला आपण धागे म्हणतो. धागे एवढे फेंमस झाले कि लोक फेसबुकवर ब्लॉगिंग करणारे लोक ट्विटरवर आले. ब्लॉगिंग साठी जे लोक ट्विटरला गेले ते ट्विटर कडे कायमचे झाले. त्यामुळे सध्या फेसबुक फक्त व्हिडिओ बघण्यासाठी वापरले जाते.

फेसबुक ट्विटर पेक्षा खूप जुने आहे त्यामुळे ट्विटरचे डाउनलोडस जास्त आहेत. जगभरात ५०० कोटी लोकांनी फेसबुक डाउनलोड केले आहे त्याप्रमाणात ट्विटर १०० कोटी लोकांनी डाउनलोडस केले आहे. डाउनलोड भलेही फेसबुकचे जास्त असतील पण ऍक्टिव्ह वापर करते ट्विटरवर जास्त आहेत. त्यामुळेच ट्विटरवर काय ट्रेंड होत आहे यांच्या बातम्या होतं असतात.

असं नाही कि फेसबुक खूपच मागे पडला आहे पण फेसबुकचा एक जमाना होता तो आता राहिला नाही. ट्विटरने फेसबुक कडून तो मान हिसकावला आहे. त्यामुळे आपण जरी फेसबुक वापरत असलो तरी डोक्यात ठेवायला पाहिजे कि सध्या ट्विटरची हवा आहे. आणि शक्य असेल तर ट्विटर वापरले तर चालतंय तुम्हाला आवडलं तर ठीक नाही तर आपलं फेसबुक जिंदाबाद.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.