MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

पोटासाठी लग्नात गाणी गायली पण पहिल्या अल्बमनंतर लोक वेडे झाले.

jagjit singh information in marathi

तुम इतना जो मुस्करा रहे हो.. बात निकलेगी तो फिर दूर तक… या गाण्यांनी सगळ्याचं पिढीला भुरळ घातली आहे. जगजीत सिंग यांची कित्येक गाणी नकळत परिस्थिती मांडत राहतात आणि ती गाणी कधी आपली होऊन जातात कळत नाही. गजल सम्राट जगजीत सिंग आज लाखो लोकांच्या मनावर राज्य करून आहेत. लोकांना गजल ऐकायची असेल तर पहिलं नाव असतं ते फक्त जगजीत सिंग यांचं. जगजीत सिंग जगासमोर येण्याअगोदर खूप साऱ्या संघर्षातून गेले आहेत. जगजीत सिंग यांच्या जन्मदिना निमीत्त या महान गायकाचे स्मरून करून त्यांच्या आयुष्याचा पट उलघडण्याचा प्रयत्न करू.

प्रसिद्ध गझल गायक जगजीत सिंग यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९४१ रोजी झाला. राजस्थानच्या श्रीगंगानगर ज़िल्हा हे त्यांचं जन्मस्थळ. त्यांचा लहानपणापासूनच संगीताकडे ओढा होता. त्यांनी उस्ताद जमाल खान आणि पंडित छगनलाल शर्मा यांच्याकडून संगीताचे धडे घेतले. सुरुवातीच्या शिक्षणानंतर जगजीत जालंधर येथे शिक्षणासाठी आले. इथे त्यांनी डीएव्ही महाविद्यालयातून पदवी संपादन केली आणि त्यानंतर कुरुक्षेत्र विद्यापीठातून इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतले.

जगजीत सिंग हे आध्यात्मिक आवाजाचे जादूगार होते. त्यांचा आवाज लोकांच्या मनात घर करून जायचा. पण एक काळ असा होता की त्यांना बी ग्रेड गायकाचा दर्जा देण्यात आला होता. जेव्हा ते पहिल्यांदा परफॉर्म करायला जाणार होते तेव्हा समोर असलेले लोक हसत होते. जगजीत सिंग यांच्यासाठी ही परिस्थिती खूप कठीण होती पण त्यांनी हिंमत हारली नाही. लोकांच्या हसण्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी गाण्याकडे लक्ष दिले आणि समोर बसलेल्या प्रेक्षकांना सुखद धक्का दिला.

जगजीत यांना गायन क्षेत्रात करिअर करायचे होते म्हणून ते १९६५ मध्ये मुंबईत आले. जगजीत सिंग यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था नव्हती. त्यावेळी ते लग्न आणि पार्ट्यांमध्ये बळजबरीने गाणी म्हणत. हळूहळू त्यांनी आपल्या सुंदर आवाजाने ओळख निर्माण केली आणि लोकांच्या हृदयात घर केले. जगजीत सिंग लोकांच्या लग्नात गाणी म्हणत असतील काही विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.

१९७६ मध्ये जगजीत सिंग यांनी चित्रा सिंगसोबत त्यांचा एक अल्बम रिलीज केला. ज्याचं नाव होतं ‘The Unforgettable’. त्यांचा पहिला अल्बम चांगलाच गाजला. या अल्बमच्या गाण्यांनी जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांना गायिकेच्या क्षेत्रातील तारे बनवले. जगजीत आणि चित्रा यांचा आवाज लोकांच्या मनावर राज्य करत होता. त्यांच्या ‘बात निकलगी तो फिर दूर तलक जायगी’ या गाण्याला लोकांची खूप पसंती मिळाली होती.

यानंतर जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांनी एकत्र संगीत कार्यक्रमात गाणे सुरू केले. जगजीत सिंग यांनी १९८० पर्यंत कठोर परिश्रम करून गझल सम्राट म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. अर्थ, प्रेमगीत, लीला, सरफरोश, तुम बिन, वीर जारा, जिस्म और जॉगर्स पार्क यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी गाणी गायली. या सिनेमांची गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत.

.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.