MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

महागाईला कंटाळून श्रीलंकन जनतेने हिंसाचार करत राष्ट्राध्यक्षांच्या घरावर मोर्चा नेला

तुम्ही जर आंतरराष्ट्रीय राजकारणाला फ़ॉलो करत असाल तर श्रीलंकेच्या बातम्या नक्की ऐकल्या असतील. चीनच्या नादी लागून श्रीलंकेनं स्वतःच्या देशाचं नुकसान करून घेतलं आहे. २ कोटीच्या आसपास लोकसंख्या असलेला श्रीलंका चीनची मालमत्ता होऊन बसला आहे. मागच्या दोन तीन सरकारने चीन कढून एवढे कर्ज घेतले आहे कि आता त्यांना ते कर्ज परत करायला पण चीन काढून नवीन कर्ज घ्यावे लागत आहे. भारताने खूप वेळा समजावून देखील श्रीलंका ऐकला नाही. आता मात्र श्रीलंकेला मोठी किंमत द्यावी लागत आहे. चीनच्या कर्जाखाली बुडलेल्या श्रीलंकेला बाहेर काढायला कोणीही पुढे यायला तयार होत नाहीये. भारतानं त्यांना मदत केली आहे पण त्याला मर्यादा आहेत. श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. महागाईने मोठे टोक गाठले आहे. सामान्य माणसांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. महागाईचे फटके सहन करणे त्यांना शक्य होत नाहीये. काल ३१ मार्चला श्रीलंकेच्या जनतेने राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षेंच्या घरावर जाळपोळ, हिंसाचार करत मोर्चा काढला आहे. मोर्चा काढणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महागाईमुळे श्रीलंकेत सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहेत.

श्रीलंकेत ३१ मार्चला रात्री काय झालं ?

गुरुवारी, 31 मार्चला मध्यरात्री हजारो नागरिकांनी राजपक्षेंच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या घराच्या दिशेनं मोर्चा काढला. यात अनेक अज्ञात सोशल मीडिया अॅक्टिव्हिस्ट सहभागी होते. आंदोलकांनी कोलंबोचे मुख्य रस्ते टायरची जाळपोळ करून रोखले. यादरम्यान आंदोलकांनी लष्कराच्या दोन बस आणि एका जीपलाही आग लावली. तसंच, पोलीस अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. AFP वृत्तसेवा संस्थेच्या अधिकृत सूत्रांनुसार, या निदर्शनांदरम्यान राजपक्षे घरात नव्हते. मात्र ते असते तर त्यांचा जीवाला धोका निर्माण झाला असता.

श्रीलंकेत महागाई इतकी का वाढली ?

श्रीलंकेची अर्थव्यवस्था तीन क्षेत्रांवर सर्वाधिक अवलंबून आहे. पर्यटन, चहा आणि कापड उद्योग. कोव्हिडमुळे जगभरात लागलेल्या लॉकडाऊनचा या तिन्ही क्षेत्रांना जबरदस्त फटका बसला. पर्यटन क्षेत्राचा श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत जवळपास 10 टक्के वाटा आहे. पण पर्यटकांचा ओघ थांबला आणि टुरिझम इंडस्ट्रीला घरघर लागली. भरीस भर म्हणजे सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध. याची श्रीलंकेला दुहेरी झळ लागली. श्रीलंकेत येणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी साधारण 25 टक्के रशिया आणि युक्रेनमधून येतात. हा आकडा कमी झालाय.

श्रीलंकन चहाचा सर्वांत मोठा आयातदार रशिया आहे. या संघर्षामुळे ती आयात कमी झालीय. या युद्धामुळे खनिज तेलाच्या किमतीही वाढतायत. त्यामुळे एकीकडे उत्पन्न कमी आणि दुसरीकडे खर्च वाढले अश्या कात्रीत श्रीलंका सापडलाय. पेट्रोल आणि रॉकेलच्या रागांमध्ये उभं राहिलेल्या 4 लोकांचा मृत्यू झालाय. त्यातले तीन वृद्ध होते. एकाचा मृत्यू तेव्हा झाला जेव्हा रांगेत उभ्या असलेल्या लोकांमधलं भांडण विकोपाला गेलं आणि लोकांनी सुरे काढून मारामारी सुरू केली. पेट्रोल-डिझेलचा काळा बाजार होऊ नये म्हणून सरकारने पेट्रोल पंपावर लष्कराचे जवान तैनात केलेत. स्वयंपाकाच्या सिलेंडरसाठीही तासनतास रांगा लागतायत. गोष्टी इतक्यावर थांबत नाहीत.

श्रीलंकेच्या आर्थिक समस्यांची चिन्हं कोविड पूर्वीच दिसायला लागली होती. त्यात 2019 साली सत्तेत आलेल्या राजपक्षे सरकारने लोकांची क्रयशक्ती म्हणजे खर्च करण्याची क्षमता वाढावी म्हणून टॅक्स कमी केला. यामुळे सरकारचं उत्पन्नही घटलं. या सरकारने देशात रासायनिक खतांवर पूर्ण बंदी घालून फक्त सेंद्रीय खतं वापरून शेती करण्याचा नियम केला. घाईघाईने घेतलेल्या या निर्णयामुळे पीक कमी झालं आणि अन्नधान्य टंचाईची तलवार टांगली गेली.
श्रीलंकेवर असलेलं परकीय कर्ज हा सुद्धा देशासाठी एक चिंतेचा विषय आहे. एप्रिल 2021 पर्यंत श्रीलंकेवर 35 अब्ज डॉलर्सचं परकीय कर्ज होतं. त्यातलं जवळपास 10 टक्के कर्ज एकट्या चीनचं होतं. श्रीलंकेने काही पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी चीनकडून कर्ज घेतलं होतं. ते प्रकल्प फसले आणि श्रीलंका चीनचं कर्ज फेडू शकली नाही. श्रीलंकेतल्या हंबनटोटा बंदराचं उदाहरण घ्या. यासाठी चीनने श्रीलंकेला 1.4 अब्ज डॉलर्सचं कर्ज दिलं. श्रीलंका ते फेडू शकला नाही, मग काय? चीनच्या एका खासगी कंपनीला 2017 साली हा प्रकल्प 99 वर्षांच्या लीजवर मिळाला. श्रीलंका पुन्हा चीनकडून अडीच अब्ज डॉलर्सचं कर्ज घेण्याच्या तयारीत आहे. श्रीलंकेकडचा परकीय चलनाचा साठा, म्हणजे फॉरेक्स रिझर्व्ह कमी होऊन जानेवारी 2022 मध्ये 2.36 अब्ज डॉलर्सवर आलं होतं. त्यांना 2022 च्या वर्षात साधारण 7 अब्ज डॉलर्सचं कर्ज फेडायचं आहे. या दोन्ही आकड्यांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे ते डिफॉल्टर होणार, कर्जबुडवे होणार ही भीती आहे. या सगळ्याचा परिणाम श्रीलंकन रुपयाच्या किमतीवरही झालाय.

एका भारतीय रुपयासाठी किंमत पावणेचार श्रीलंकन रुपये इतकी आहे. आणि एका अमेरिकन डॉलरसाठी 287 श्रीलंकन रुपये मोजावे लागतायत. रुपयाच्या घसरलेल्या किमतीमुळे त्यांना कुठलीही आयात करताना खूप भुर्दंड बसतोय.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.