MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

पहिल्या मॅच मध्ये शतक ठोकणारा अझरुद्दीन फिक्सिंग मध्ये अडकला होता.

१९८३ चा वर्ल्ड कप जिंकून एकच वर्ष झालं होत. १९८४ ला भारताची टीम टेस्ट मॅचची सिरीज खेळायला इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली होती. मागच्या वर्षी वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या टीमचा कॅप्टन कपिल देवचा फॉर्म टेस्ट मॅच मध्ये खराब झाला होता. टीम व्यवस्थापन मंडळाने कपिल देवला बाहेर बसवून एकवीस वर्षाच्या पोराला खेळायला संधी दिली. नशिबानं संधी मिळाली असली तरी त्यानं संधीचा पुरेपूर फायदा घेतला. पहिल्याच पारीमध्ये १०१ रन बनवून रेकॉर्ड केला. मोहंमद अझरुद्दीन त्याच नाव. आज हैप्पी बडे आहे त्याचा.

पहिल्याच मॅच मध्ये लागोपाठ शतक ठोकल्यामुळे अझरुद्दीन घराघरामध्ये पोहचला.

इंग्लंड विरोधात चाललेल्या टेस्ट मॅच मध्ये अझरुद्दीन फक्त एक शतक करून थांबला नाही. त्याच सिरीज मध्ये त्याने लागोपाठ तीन शतक ठोकली. इंग्लंड सारख्या बलाढ्य टीमच्या विरोधात, परत त्यांच्याच देशात आपल्या देशाचा एकवीस वर्षीय पोरगा शतका वर शतक ठोकतोय म्हंटल्यावर त्याची हवा तर होणारच ना ? अझरुद्दीन बद्दल वर्तमान पत्रांमध्ये लेख छापून यायला लागले. क्रिकेट प्रेमीनी त्याची खेळी बघायला रात्र रात्र जागून काढायला सुरुवात केली. मॅच इंग्लंडला असल्यामुळे भारतात ती रात्री असे. पदार्पणाच्या थोड्यात दिवसात अझरुद्दीन सर्वांचा आवडता खेळाडूं झाला. अझरुद्दीन भारताच्या क्रिकेटचं भविष्य असल्याचंच त्यावेळी बोललं जायचं.

१९९० ला कर्णधारपदाची धुरा आली.

१९८४ ला भारतीय टीममध्ये आल्यापासून अझरुद्दीनची खेळी वाढतच होती. मॅच भारतात असो कि परदेशात अझरुद्दीन त्याच्या खेळीत बदल करत नव्हता. अझरुद्दीनच्या खेळात आक्रमकता होती. फलंदाजी असो नाही तर फिल्डिंग अझरुद्दीन त्याचा १०० % द्यायचा. १९९० येई पर्यंत भारताचे कपिल देव, रवी शात्री, सुनील गावस्कर सारखे खेळाडू निवृत्त झाले होते. त्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड नव्या कर्णधाराच्या शोधात होती. मोहंमद अझरुद्दीन एकदम करेक्ट होता भारतीय टीमचा कॅप्टन होण्यासाठी. बीसीसीआयने अझरुद्दीनला कर्णधारपदाची विचारणा केली. अझरुद्दीनने कर्णधार होणे स्वीकारले. १९९० ते २००० पर्यंत मोहमद अझरुद्दीन भारतीय टीमचा कर्णधार राहिला. भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये अझरुद्दीनच नाव घेतलं जात.

भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर असताना अझरुद्दीनवर फिक्सिंगचे आरोप झाले.

टेस्ट आणि एक दिवसीय मॅच खेळणायसाठी भारतीय टीम अझरुद्दीनच्या कप्तानीमध्ये आफ्रिका दौऱ्यावर होती. सिरीज चालू झाली होती. दोन्ही देशातले लोक क्रिकेटची मजा घेत खेळ पाहत होते. पण अचानक सर्व वृत्त वाहिन्यांवर बातम्या झळकायला लागल्या कि आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय टीमने मॅच फिक्सिंग केली आहे. मॅच फिक्सिंग मध्ये आधीच ठरलेले असते कोण जिंकणार कोण हरणार. त्याबद्दल सांगायला नको. फिक्सिंग बद्दल कोणाला माहिती नसेल?

मॅच फिक्सिंगच्या सगळ्या आरोपांमध्ये आफ्रिका संघाचा कॅप्टन ‘हंसी क्रोणजे’ आणि भारतीय टीमचा कॅप्टन ‘महंमद अझरुद्दीनचे’ नाव मुख्य आरोपी म्हणून पुढं आले. दिल्लीतला सोन्याचा व्यापारी ‘मनोज गुप्ता’ आणि हंसी क्रोणजे यांची भेट अझरुद्दीनने घडवून आणल्याचा आरोप झाला. मनोज गुप्ता फिक्सर होता. फिक्सिंगचे आरोप झाल्यावर सीबीआयने अझरुद्दीनवर केस दाखल केली. बीसीसीआयने अझरुद्दीनला बॅन केले. अझरुद्दीनचे करियर तिथंच संपले. त्याच्या नंतर अझरुद्दीन फार खेळू शकला नाही.

२०१२ ला आंध्रप्रदेश न्यायालयाकडून अझरुद्दीन दोषमुक्त झाला.

हंसी क्रोणजे आणि अझरुद्दीन दोघांवर फिक्सिंगचे आरोप झाले होते. पण दुर्दैवाने २००१ ला क्रोणजेचा विमान अपघातात मृत्यू झाला. अझरुद्दीनवर मात्र चौकशींची टांगती तालावर होती. सीबीआयने अझरुद्दीन मॅच फिक्सिंगच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ‘माधवन’ समिती बसवली. माधवन समितीने अझरुद्दीनला दोषी ठरवले होते. मनोज गुप्ता आणि अझरुद्दीन यांचे संबंध असल्याचं माधवन समितीने म्हंटल होत.

माधवन समितीला मोहंमद अझरुद्दीनने आंध्रप्रदेश न्यायालयात आव्हान दिल. समितीचे अध्यक्ष माधवन यांचे क्रिकेटचे ज्ञान कमी आहे. त्यामुळे त्यांच्या समिती अहवालामध्ये बऱ्याच चुका असल्याचं अझरुद्दीनने न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिलं. अझरुद्दीनची बाजू ऐकून घेतल्यावर आंध्रप्रदेश न्यायालयाने माधवन समितीचा अहवाल चुकीचा ठरवून अझरुद्दीनची मॅच फिक्सिंग प्रकरणातून सुटका केली.

फिक्सिंगचे आरोप झाल्यावर १२ वर्षांनी का होईना अझरुद्दीनची त्यातून निर्दोष मुक्तता झाली. पण झालेल्या आरोपामुळे अझरुद्दीनला क्रिकेट पासून दूर राहायायला लागले. आता मोहंमद अझरुद्दीन हैदराबाद क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष आहे.

हे पण वाचा

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.