खेड्यातील लोकांना शहराने जेवढा न्यूनगंड दिलाय तेवढा कशाने दिला नसेल. पुण्या मुंबईतून गावाकडून आलेली गॅंग दिवसभर गावातल्या लोकांना सल्ले देण्यातच व्यस्त असते. खाण्यापासून झोपण्यापर्यंत खेड्यातील प्रत्येक गोष्ट शहरी लोकांनी डाउन मार्केट म्हणून बघितली पण आता काळ बदललाय. खेड्यातील नाकारलेल्या या गोष्टी आज शहरात ब्रँड म्हणून पाय रोवून बसले आहेत. चला तर मग एक नजर टाकू अशे कोणते व्यवसाय आहेत ज्यांनी मार्केट मारलंय किंवा जे मार्केट मारू शकतात.
चुलीवरची भाकर
शहरातील मुख्य भागात चुलीवरच्या भाकरी, मटण, चिकन, भरीत या पाट्या गेल्या दहा वर्षात इतक्या वाढल्यात कि जवळपास सगळ्या हॉटेल मालकांनी याचा विशेष मेनू आपल्या मेनूकार्ड मध्ये वाढवला. एवढंच नाही तर खाणाऱ्याला अस्सल गावरान तडका फील देण्यासाठी बैल जोडी, पाचटाची झोपडी अशी इंटिरियर बनवून घेतले. काही ठिकाणी तर प्रत्यक्ष बायका चुलीवर भाकरी टाकताना दिसतात. खेड्यात प्रत्येक घरात दिसणारं वातावरण आज शहरात विशेष म्हणून मिरवले जाते.
चहा चपाती
पुण्यात कॉलेजमधल्या पोरा पोरींनी चहा चपाती नावाचं नाश्ता केंद्र चालू केलं. चहा चपाती म्हणजे जवळपास प्रत्येकाने कधी ना कधी लहानपणी खाल्ली असणारच. मोठेपणी खायला काही हरकत नाही. म्हणून या पोरांनी चहा चपाती सुरु केली. यांची भन्नाट आयडिया बघून मीडियाने यांना चांगलं उचललं. चहा चपातीला इतर व्यवसायासारखा दर्जा मिळवून देण्यात हे पोरं यशस्वी झाले.
गुळाचा चहा
चहाचा व्यवसाय होऊ शकतो हे मार्केटला थोडं आधी कळलं पण गुळाचा चहा सुद्धा तितकंच मार्केट गाजवलं वाटलं नव्हतं. गुळाचा चहा शरीराला पण चांगला असतो अशी जाहिरात झाल्यामुळे लोकांनी याला चांगलंच उचलून धरलं आहे. काही लोकांनी याच्या पुढे जाऊन खांडसरीचा चहा सुद्धा आणलाय. खांडसरी हे प्रकरण नेमकं काय असतं त्यासाठी दुकानदारालाच विचारा.
हुरडा पार्टी
शहरातील लोकांना गर्दीपासून दूर निसर्गरम्य परिसरात सुट्टी घालवायची असेल तर हुरडा पार्टीवाल्यानी चांगला पर्याय दिला आहे. शेतात हुरडा आणि गुळ शेंगदाणे सोबत असले कि कळतं सुख म्हणजे नक्की काय असतं. हुरडा पार्टीमुळे ऍग्रो टुरिझम वाढला. ग्रामीण भागाकडे लोक वेगळ्या नजरेने बघू लागले. गावची शांतता लोकांना बोलावू लागली. त्यामुळे खेडयात राहून पण दोन पैसे हातात जास्त राहायला लागले.
पापड आणि लोणचे
शहरात किती पण फॅन्सी पापड आणि लोणचे येऊ देत मागणी असते ती ग्रामीण भागातील लोणचे आणि पापडाला. आपली आई-आजी जीव ओतून हे पदार्थ बनवतात त्यांची चव निराळीच असते. कुठल्याही कंपनीचे ब्रॅडेड पापड घ्या पण चव असते ती आपल्या आईच्या हातालाच. गाडग्यात मुरायला टाकलेले लोणचे मार्केट मधल्या हायब्रीड लोणच्याची कधीच बरोबरी करू शकणार नाही. अजून पण संधी आहेत या क्षेत्रात बघा हात पाय मारायला जमलं तर…
मसाले
गावाकडच्या मसाल्याना अजूनही कोणत्याच मोठ्या ब्रॅण्डला टक्कर देता अली नाही. तुम्ही किती पण कडक पॅकिंगवाले मसाले खा तुम्हाला चव सापडणार नाही. एखाद्या भागातील विशेष मसाला म्हणून एखादा मोठा ब्रँड या व्यवसायात उतरला तर खात्रीने सांगू शकतो याला देशभर मागणी मिळेल. खान्देशी मसाला, कोल्हापुरी मसाला ही भविष्यात ब्रँड निर्माण करू शकतात. तुमच्या गावातील किंवा एखाद्या गावातील विशिष्ट चव असलेला मसाला असेल तर आम्हाला पण सांगा.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?