नागराजचे दोन प्रकारचे चाहते आहेत एक असतो जो नागराजचा कोणताही चित्रपट आला तरी डोळे झाकून बघतो. दुसरा चाहता वर्ग आहे जो नागराजच्या चित्रपटातील घटनांचा अर्थ शोधायचा प्रयत्न करतो. सैराटचा पहिला भाग सगळ्यांना आवडतो तर दुसऱ्या भागाबद्दल काहींचं वेगळं मत येतं. पण ज्याला प्रत्येक घटनेचा अर्थ सापडतो त्याला दुसरा भाग जास्त आवडतो. सैराट मनोरंजनाकडून वास्तवाकडे जाणारा चित्रपट आहे. नागराज त्याची कथा मनोरंजनाचा आधार घेऊन लोकांना सांगतो. पडद्यावर नायक आणि नायिका फक्त ज्यांना वावरताना दिसतात त्यांना अजून नागराज काळाला नाही. पिस्तुल्या, फॅन्ड्री, सैराट आणि झुंड या सगळ्यात एक समान धागा आहे. कथा मांडताना जमेल तेवढं वास्तवदर्शी तो दाखवतो. प्रत्येक चित्रपटात तो बॅकग्राऊंडला एखादा संदर्भ दाखवत असतो. सैराटच्या शेवटच्या सीनमध्ये लहान मुलगा रक्ताने माखलेल्या पायाने घराबाहेर पडतो हा सीन आजही आठवून काळजात धस्स होतं. जर नीट बघितलं तर लक्षात येतं कि नागराजने रक्ताचे ठसे इतके नैसर्गिक दाखवले आहेत कि खून कसा झाला असेल हे दाखवायची गरज वाटत नाही. निरागस मुलाच्या पायाचे रक्ताचे ठसे गुन्हेगारांच्या क्रूरतेची जाणीव करून देतात. हा सीन शूट करताना नागराजला काय अडचण आली किंवा कसा शूट केला असेल ही माहिती तुमच्यापर्यंत पोहचली पाहिजे.
आर्ची आणि परशाचे लग्न होऊन सर्व सुरळीत चालले आहे. त्यानंतर अचानक कथा अशा अनपेक्षित वळणावर येऊन ठेपली कि कोणाला कल्पना नव्हती. शेवटी काय झाले, हे तुम्ही पडद्यावर पाहिले आहेच. सैराटच्या चित्रीकरणाच्या दरम्यान अभिनय करतांना एकमेकांच्या पूर्णपणे ओळखी व्हावी म्हणून सर्व ग्रामीण भागातील हे कलाकार एकत्र रहात होते. नागराजची ही कल्पना होती. या चित्रपटातील लहान मुलगा आणि त्याचे आईवडील सुद्धा जवळ जवळ आठ दिवस या कलाकारांबरोबर एकत्र राहत होते.
नागराज मंजुळे म्हणतात की, एकत्र ठेवण्याचे उद्दिष्टे म्हणजे त्या बाळाला इतर कलाकारांचा लळा लावायचा होता. तो आईला सोडुन या कलाकारांबरोबर एकटा कसा राहील, हा प्रयत्न होता. परंतु ते बाळ मात्र आईशिवाय रहायला तयार नव्हते. आईशिवाय बाळाची शूटिंग करणे मोठं अवघड काम होतं. त्यामुळे हे शेवटचे दृश्य म्हणजे खुपच मोठे दिव्य होऊन बसले होते. ती अजिबात सोपी गोष्ट नव्हती. कोणत्याही दिग्दर्शकाला पण अडचणीत टाकणारे हे चित्रीकरण होते. आता काय करावे ? असा प्रश्न नागराजला पडला असतांना एखादी वीज चमकुन लख्ख प्रकाश पडावा अशी आयडिया सुचली. सुरुवातीला कथेचा आणि बाळाच्या आईचा काही संबंध नसताना त्या बाळाच्या आईलाच शेजारणीचे पात्र द्यायचे अशी कल्पना आयत्या वेळेस नागराजच्या डोक्यात आली. त्यामुळे थोडा तरी बाळ आईपासून या लोकांत मिसळायला लागला. चित्रीकरणादरम्यान बाळाची खरी आई शेजारीण झाली त्यामुळे बाळाला एक सहजता सापडली.
आता शेवटच्या दृश्यात बाळ शेजारणीच्या ( त्याची खरी आई) कडेवरून हसत हसत टाटा वगैरे करतो आणि घरात जायला निघतो. त्यामुळे त्याला चित्रपटातील त्याच्या आई-वडिलांचे काय झाले, हे माहितच नाही, आणि यामुळे प्रेक्षकांना पण पुढील कल्पना करता आली नाही. नागराज मंजुळे पुढे सांगतात, आता त्याला त्या ठिकाणावर नेऊन रडवायचे होते. तेव्हा एक भन्नाट कल्पना सुचली. आतापर्यंत इतर लोकांनी त्याला खेळण्याचे वेड लावले होते. त्याचा फायदा करून घ्यायचा हा विचार डोक्यात आला. त्याला रिमोट कंट्रोलची गाडी दिसली की तो लगेच त्या गाडीच्या दिशेने निघायचा. नागराज मंजुळे स्वतः रिमोटने गाडी चालवायचे. तो गाडीजवळ आला की गाडी रिमोटने दूर पळवायची. एक जण कॅमेऱ्यात येऊ नये अशा ठिकाणी उभे राहुन बाळाला उचलुन घ्यायचा आणि एका पलंगाच्या बाजूला लपवायचा आणि त्याची खरी आई तिला पण झटकन बाजूला हो, असे सांगण्यात आले होते, कारण हे कॅमेऱ्यात यायला नको होते. एकाच प्रयत्नात हे संपवायचे होते . असे करत करत त्याला पुढे आणले. ज्या वेळेस त्याला रडवायचे होते, त्यावेळेस गाडी उचलुन घेतली, आणि तो रडत रडत शेजारणीकडे ( त्याच्या आईकडे) वापस फिरला.
अशा प्रकारे ही तारेवरील कसरत करीत हे चित्रीकरण पुर्ण झाले. हे सगळं इतकं वास्तविक वाटत होतं कि त्यामुळे सर्व चित्रपटगृह सुन्न होऊन, प्रेक्षक उतरलेला चेहरा घेऊन बाहेर पडत होते. अशा प्रकारे त्या बाळाचे रडत रडत रक्ताने माखलेले पाय घेऊन बाहेर पडण्याचे चित्रीकरण यशस्वी पार पाडले.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?