MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

खिश्यावर तिरंगा,ऐटीत चालणं अन झेंड्याचा दिवस आठवला कि रोमांच उभा राहतो.

दहा बारा खोलीची सातवी पर्यंतची शाळा आमची,से दोनशे पोर पोरी असतील सगळे मिळून.काही आमच्या गावातले तर उरलेले आजू बाजूच्या खेड्या पाड्यातले.ज्यांच्या कडे सायकली होत्या ते सायकलीवर यायचे तर बाकी पोर पोरी दोन तीन किलोमीटर पायी यायचे.शाळा दहा वाजता भरायची पण आम्ही सगळे घरून आठ, साडे आठलाच निघायचो.मस्त पैकी टवाळक्या करत कसे बसे शाळेत दहा पर्यंत पोहचायचो.रोज बर्याच जणांना उशीर व्हायचा. गुरुजीपण काय बोलायचे नाही हा कधी कधी पट्टीने मारायचे .गावातले पोर आम्ही काय फरक पडायचा नाही आम्हाला. पण आम्ही सगळे चिमुकले २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला मात्र आमच्या प्रिय झेंड्याच्या दिवशी सकाळी सातला शाळेत हजर असायचो.सगळे पोर पोरी टाप टीप असायचो ,सर मॅडमची नियोजनाची गरबड चालू असायची, वातावरण कस एकदम सात्विक असायचं,देशप्रेमाने मन उभारून गेलेले असायचे. झेंड्याच्या दिवशीच्या आठवणी आज देखील रोमांच उभा करतात.

दहा बारा खोलीची सातवी पर्यंतची शाळा आमची, से दोनशे पोर पोरी असतील सगळे मिळून. काही आमच्या गावातले तर उरलेले आजू बाजूच्या खेड्या पाड्यातले. ज्यांच्या कडे सायकली होत्या ते सायकलीवर यायचे तर बाकी पोर पोरी दोन तीन किलोमीटर पायी यायचे. शाळा दहा वाजता भरायची पण आम्ही सगळे घरून आठ, साडे आठलाच निघायचो. मस्त पैकी टवाळक्या करत कसे बसे शाळेत दहा पर्यंत पोहचायचो. रोज बऱ्याच जणांना उशीर व्हायचा. गुरुजीपण काय बोलायचे नाही, हा कधी कधी पट्टीने मारायचे. गावातले पोर आम्ही काय फरक पडायचा नाही आम्हाला. पण आम्ही सगळे चिमुकले २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला मात्र आमच्या प्रिय झेंड्याच्या दिवशी सकाळी सातला शाळेत हजर असायचो. सगळे पोरं पोरी टाप टीप असायचो, सर मॅडमची नियोजनाची गरबड चालू असायची, वातावरण कस एकदम सात्विक असायचं, देशप्रेमाने मन भरून गेलेले असायचे. झेंड्याच्या दिवशीच्या आठवणी आज देखील रोमांच उभा करतात.

झेंड्याच्या आधीचा दिवस खूप महत्वाचा असायचा.

नवं वर्ष सुरु झालं कि दोन गोष्टी व्हायच्या. एक म्हणजे आम्ही रंगांच्या पेन्सिली आणायचो आणि वहीच्या पानावर ‘हैप्पी न्यू इयर’ लिहून एकमेकांना द्यायचो. नवं वर्षाचं हे असं स्वागत आठ एक दिवस चालायचं.दुसरं म्हणजे आमचे लाडके सुक्रे मामा एक कागद घेउन यायचे आणि सूचना सांगायचे .’विद्यार्थी मित्रांनॊ दरवर्षी प्रमाणे आपल्या शाळेने २६ जानेवारीच्या निम्मिताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि खेळांचे आयोजन केले आहे. ज्या विद्यर्थ्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी आपले नावे नोंदवावीत’. मामानी सूचना सांगितली कि एकच जल्लोष व्हायचा. काही पोर वर्षभरापासून खेळांची वाट बघायची. त्यांना ह्या निमित्ताने खेळायची संधी मिळणार होती. बाकी आमच्या सारख्या पोरांना सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाने लेझीम मध्ये भाग घ्यायला मिळायचा. १५ जानेवारीपासून सराव सुरु व्हायचा. २५ जानेवारीलाला मुख्य संचालनाचे प्रात्याक्षिक व्हायचे. ह्या दिवशी सरावामध्ये आलेल्या चुका कमी केल्या जायच्या. प्रात्याक्षिक झालं कि सर आम्हाला झेंड्याच्या दिवसासाठी सूचना द्यायचे आणि आमची सुट्टी व्हायची. त्यामुळे झेंड्याच्या आधीचा दिवस खूप महत्वाचा असायचा.

२६ जानेवारी झेंड्याचा दिवस.

झेंड्याला सकाळी लवकर जायचं असल्यामुळें आदल्या दिवशी लवकर झोपायचो. मला सकाळी लवकर उठव म्हणून आईला सांगितलं जायचं. आई वेळेच्या आधीच उठवायची आणि सुरु व्हायचा आमचा झेंड्याचा दिवस .अंघोळ करून तिरंगा घेऊन मित्रांच्या घरी जायचं. मग आम्ही शाळेकडे कूच करायचो. शाळेत आम्ही सर मॅडमच्या आधीच पोहचायचो. आमचे लाडके रंगारी सर सर्व सरांच्या आधी यायचे कारण त्यांच्याकडे कडे संदेश लिहण्याचे काम असायचे. रंगारी सरांच्या आजूबाजूला पूर्ण शाळा जमायची. सर काय लिहतात याच्या कडे सगळ्यांचे लक्ष असायच. शाळेच्या मुख्य बोर्डावर सर मोठ्या अक्षरात लिहायचे ‘प्रजासक्ताक दिन चिरायू होवो ‘. त्यावेळी हे चिरायू होवो म्हणजे काय असतंय काय कळायचं नाही पण वाचायला भारी वाटायचं. शाळांना थोड्या वेळांन मुख्याध्यापक यायचे आणि संचालन सुरु व्हायच. लेझीम पथकं सगळ्यात पुढे असायचं. त्यांच्या मागे प्रत्येक वर्गातल्या एका पाठोपाठ मुलांच्या रांगा असायच्या. संचालन शाळेतून गावात जायचं. गावात पोहचल्यावर संचालन गावचा राउंड लावायचं. आपल्या घरासमोर संचालन आलं कि किती आनंद व्हायचं म्हणून काय सांगावं. घरचे लोक पण आमच्या कडे असे बघायचे कि आनंदाला पारावर राहायचा नाही. राऊंडचा शेवट गावाच्या ग्रामपंचायतीच्या आवारात होत असायचा. सरपंच आणि इतर मंडळी तिथे उपस्थित असायचे. आम्ही सगळे रांगेत उभे राहायचो. सगळी मंडळी आली कि ध्वजारोहण सुरु व्हायचं. सरपंचाच्या हातून ध्वजारोहण होत असे. राष्ट्रगीत झालं कि ‘भारत माता कि जय’ ने वातावरणत भारावून जायचं . सरपंचानी आमच्यासाठी चॉकलेट अन बिस्किटे आणलेली असायची ती आम्हला वाटली जायची. मग झेंड्याच्या कार्यक्रमाची सांगता व्हायची.

आज शाळेचे दिवस संपले आहेत. शिक्षणासाठी कामासाठी गावातून बाहेर यावं लागलं आहे. पण २६ जानेवारी आली कि गावाची अन शाळेची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.