पेटीएम पर १०० ,२०० रुपये प्राप्त हुए , हा असा आवाज आला कि दुकानदार निश्चित होऊन जातो. ना बॅलेन्स बघायची कटकट ना बँके कडून मेसेज यायची वाट बघायला लागते . पण ह्याच निश्चित असण्याचा फायदा काही पोरांनी घेतला आहे. पेटीएम सारखंच पण खोटं अँप त्यांनी बनवलंय .अनेक दुकानदारांना गंडवल्यावर मुंबईच्या साकीनाका भागात पोलिसांनी त्यांना अटक केलीये.
मंगेश आणि दुर्गेश कॉलेजला जाणारे पोर आहेत. पण कोरोना मुळे कॉलेज बंद आहे. घरी काही काम नाही. त्यामुळे त्यांचं दिवसभर काय चालत असेल या बद्दल विचारायला नको. ऑनलाईन कॉलेज असतंय पण ह्यांच ऑफलाईन मधेच डोकं लागत नव्हतं तिथे ऑनलाईनच काय घेऊन बसले. दिवसभर गल्लीच्या नाक्यावर बसणं, रिकाम्या गप्पा मारणं यांचं नेहमीच काम. असं म्हणतात रिकामं डोकं सैतानाचा घर असत. ज्याचं पण डोकं रिकामं असत त्याचा शोध घेत सैतान बरोबर येतो. मंग्या आणि दर्ग्या सोबत पण बरोबर असच झालंय .
संध्याकाळची पाच सहाची गोस्ट असेल त्यांच्या गल्लीतला दादा राजू नाक्यावर आला. दर्ग्या आणि मंग्या त्यांच्या टवाळक्या करत बसले होते . राजूने त्यांना बोलवून घेतले आणि म्हणला, “काय रे मंग्या काय करायला?”
मंग्या – काय नाही दादा असच गप्पा मारत बसलोयत.
राजू-माझ्या कडे एक काम आहे काम कराल का तुम्ही दोघे ?
मंग्या -कसले काम दादा ?
राजू -आहे एक नंबर काम आहे. माझ्यासाठी शॉपिंग करायची आहे.
आता शॉपिंग करायचं कुठं काम असतंय होय मंग्या दर्ग्याला म्हणला. पण दर्ग्या शातीर होता. त्याला समजलं काम सोपंय आपण करू शकतो त्याने राजूला विचारलं आम्हाला पैसे किती देणार ? राजू बोलला, तुम्ही काम करा बरोबर देतो पैसे. कराल का मग काम ?’ मंग्या थोडा हो नाही करत होता पण दर्ग्या एकदम तयार होता. मंग्याला न विचारातच त् होकार दिला. राजूने त्यांना उद्या त्याच्या अड्ड्यावर यायला सांगितलं आणि तो निघून गेला.
मंग्या आणि दर्ग्या उद्या कामावर जाणार होते. चार पैसे मिळणार म्हणून गडी एकदम खुश होते. घरी कोणालाही सांगितलं नाही . घरच्यांना सांगितले तर घरचे म्हणतील शॉपिंग करायचं कुठं काम असत का ? त्यामुळे त्यांना ही गोष्ट दोघातच ठेवली. सकाळी अड्ड्यावर गेले राजूला भेटले. राजुने त्या दोघांना दोन मोबाइल दिले आणि सांगितल, ‘तुमचं काम आहे फक्त ज्या दुकानात पेटीएमच साऊंड बॉक्स आहे ते बघायचं. एकदाका बॉक्स दिसला कि दुकानात जायचं तुम्हला वाटेल ते विकत घ्यायचं. मधेच मंग्या न विचारलं पैसे? पैसे कोण देणार ? राजू थोडा हसला अन म्हणलं येड्या पैसे मी देणारय तुम्ही फक्त सामान घेउन यायचं. चला लागा कामाला तुम्हाला जो मोबाइल दिलाय त्यात आहेत पैसे.
दर्ग्या आणि मंग्या दोघे प्रत्येक दुकानात जायचे पेटीएमच साऊंड बॉक्स दिसला कि वाटेल ते घ्यायचे, वाटेल ते खायचे. पेटीएम वरून पेमेन्ट करायचे. पेमेंट झालं कि साऊंड बॉक्स पैसे आले म्हणून आवाज करायचा आणि हे गडी निघाले सामान घेउन दुकानाच्या बाहेर. हे असं त्यांचं काम. आणलेलं सगळं सामान राजुच्या हवाली करायचे. राजू त्यांना दिवसाचे हजार एक रुपये द्यायचा. एक महिनाभर हे मस्त चाललं पण एके दिवशी मंग्या आणि दर्ग्या दुकानात गेले. खरेदी केली पेटीएम वरून पेमेन्ट देखील केला पण दुकानदार काय त्यांना दुकानाच्या बाहेर जाऊ देईना. जो पर्यंत मला बँकेकडून मेसेज येत नाही तोपर्यँत तुम्ही इथंच बसायचं तशी त्यानं ताकीद दिली. पेमेन्ट झालं होत पण मेसेज येत नव्हता. ह्यांनी राजुला फोन केला राजुने त्यांना दुकानातून पळून जायला सांगितलं पण दुकानदार काय त्यांना जाऊ देत नव्हता. दुकानदारानं पोलिसांना बोलावलं. पोलीस आले आणि मंग्या दर्ग्याला त्यांनी अटक केली. ह्या दोघांना पण काही कळेना काय चाललंय. ते पोलिसांना विचारात होते आम्ही काय केलय ? तेंव्हा पोलिसांनी त्यांना सांगितले तुम्ही खोटं पेटीएम वापरत आहेत आणि दुकानदारांना लुटत आहात. मग ह्यांनी पोलसांना सांगितले पण हे तर आम्हाला राजुने दिले आहे. आम्हाला नाही माहिती हे काय होत. मग पोलीस राजुच्या घरी गेले तर राजू फरार होता. राजुच्या नादात हे दोघे मात्र जेल गेले.
राजू सारखे लोक लहान मुलांना घेऊन असे काम करत आहेत . त्यामुळे दुकानदारांना खबरदारी घेऊन पेटीएम केल्यावर बॅलेन्स बघून घ्यावा म्हणजे कोणी फसवणार नाही. आणि जर आपल्याला कोणी असे खोटे अँप देत असेल तर कृपया करून वापरू नका नाही तर जेल नक्की आहे.
( घटनेला साजेशी पात्रांची नावे बदलली आहेत पण ही घटना वास्तव आहे)
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !