कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण आहे. रुग्ण संख्या कमी होण्याचं प्रमाण काही दिसत नव्हतं. सुदैवाने पुणे शहरातील चिंता हलकीशी कमी होताना दिसत आहे. एक्टिव्ह रुग्णसंख्या घटत असल्याची बातमी स्वतः पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त
पुणे मनपा हद्दीत सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीन दिवसांत नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक असल्याने सक्रिय रुग्णसंख्या ४,५२४ ने घटली आहे. शिवाय बुधवार २१ एप्रिल रात्री शेवटची आकडेवारीनुसार सध्या उपचार सुरु असलेले ५१,९२० रुग्ण पुण्यात आहेत. त्यापैकी नवीन रुग्ण ५,५२९ आहेत. बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णाची ६५३० आहे, म्हणजेच नवीन रुग्णाच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णाची संख्या जास्त आहे. बुधवारी दिवभरात ५६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे
मुंबई मध्ये सुद्धा परिस्थिती सुधारताना दिसत आहे. मुंबई शहरात नवीन रुग्णाची संख्या ७६८४ एवढी आहे तर बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णाची संख्या ६७९० आहे. बरे झालेल्या रुग्णाचा दर ८४% आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा दर ४८ दिवसांवर गेला आहे.
एकूण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर बुधवार रात्री पर्यंत नवीन रुग्णाची संख्या ६७४६८ होती, तर ५४९८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते हि रुग्ण संख्या पुढच्या काही दिवसात अजून खाली येईल. रुग्ण वाढीचा आलेख एकदा खाली गेला कि दुसरी लाट कमी व्हायला सुरु झाली असं म्हणायला हरकत नाही.
हे खास आपल्यासाठी
बलात्कार करणाऱ्यांची मानसिकता कशी असते ?
संत रोहिदास भारतातील एकमेव संत ज्यांना सोळा नावाने ओळखलं जातं.
मजुरांना घरी पाठवले नसते तर ते रस्त्यावर मरून पडले असते म्हणतोय सोनू सूद….