MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

खुशखबर- महाराष्ट्रात १८ वर्षांपुढील सर्वाना मोफत लस

खुशखबर- महाराष्ट्रात १८ वर्षांपुढील सर्वाना मोफत लस

१ मे पासून केंद्र सरकारने १८ वर्षांपुढील सर्वाना लस देण्याची घोषणा केली. त्यानंतर विविध राज्यांनी हि लस मोफत देण्याची घोषणा केली. उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यांनी लस मोफत देण्याची घोषणा केली. यानंतर आता महाराष्ट्राने मोठा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सधन लोकांनी लस विकत घ्यावी असं विधान केलं होतं. यानंतर निर्णय काय होईल म्हणून सगळ्यांच्या नजरा उंचावल्या होत्या. महाराष्ट्रात रुग्णाची वाढती संख्या पाहता वेगाने लसीकरण करण्याची गरज होती. या पार्श्वभूमीवर लसीच्या किंमतीचा वाद सुरु झाला. पण या सर्व वादावर पडदा टाकत महाराष्ट्र सरकारने हि लस मोफत असल्याची घोषणा केली. स्पुतनिक -V लशीला परवानगी दिल्यानंतर घरोघरी जाऊन लोकांना लस देण्याची योजना सुरु आहे.

राज्यातील १८ वर्षांपुढील सर्वाना मोफत व चांगली लस देण्यासाठी जागतिक टेंडर काढले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. मंत्री नवाब मलिक यांनी सदर घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला दुजोरा दिला आहे असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

आतापर्यन्त भारतात १० कोटीपेक्षा जास्त लोकांना लसीकरण करण्यात आले आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.