महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. महिला आज आत्मविश्वासाने वावरतात पण यासाठी सुरवातीच्या अनेक महिलांना खूप...
मराठी मिरर
आता अजून एक,शाश्वत विकासाच्या जाहीरनाम्यातील उदिष्टांमध्ये स्त्री-पुरुष समानता हे एक उद्दिष्ट आहे. कारण प्राचीन काळापासून स्त्रिया कायमच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या कायम होरपळत आहेत. इतिहासापासून कुटुंबात, समाजात दुय्यम स्थान स्त्रियांना आजही समान अधिकार असल्याचे दिसत नाही.कारण एकविसाव्या शतकात ही 87.09% कुटुंब प्रमुख पुरुष आहेत आणि 12.88% स्त्री प्रमुख घरे आहेत. ज्याचा परिणाम अनेक बाबींतून पुढे येतात, ज्यामध्ये स्त्रियांविरुद्ध वाढता हिंसाचार हे स्त्रिया असमान, असल्याचं पाहिलं लक्षण आहे. विशेषतः वाढत्या घरेलु हिंसचाराचे प्रमाण. 15 ते 49 या वयोगटातील स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या हिंसेमध्ये पती पत्नीच्या संबंधमधल्या हिंसेचे प्रमाणही बरेच मोठे आहे. परंतु अशा घटनांची नोंद खूप कमी प्रमाणावर होते आणि त्याला जबाबदार म्हणजे असक्षम स्त्री जिला समाजाने नेहमी कमजोर समजून मागे राहण्यास भाग पाडले. मागील टाळेबंदी च्या काळात तर घरेलु हिंसाचारमध्ये महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्याचा क्रमांक पहिल्या पाच राज्यांमध्ये लागतो. स्त्री पुरुष असमानता फक्त आहे त्या पिढीला त्रासदायक आहे एवढेच नाही तर पुढच्या पिढीतील मुलामुलींना घरातील असमनातेला सामोरे जावे लागते. ज्याचा परिणाम घरातील स्त्री, मुलगी पुरूषी मानसिकतेला बळी पडून ती सक्षमते पासून कोसो दूर राहते. ही झाली सामाजिक असमानता.पण अशीच असमनता आर्थिक बाबिंतही पाहायला मिळते जसे की पुरुष कामगारांना महिला कामगारांपेक्षा त्याच कामासाठी 25% जास्त मोबदला मिळतो.जर ही परिस्थिती अशीच राहिली तर स्त्रिया कायम आर्थिक आणि पर्यायाने सामाजिक रित्या दुर्बल राहतील. त्यामुळे अशा संरचनात्मक असमानतेचा प्रामुख्याने विचार करणे आणि त्यात अग्रणी बदल घडवणे गरजेचे आहे. कारण कोणत्याही वाईट परिस्थितीत स्त्रियाना पुरुषांपेक्षा जास्त सहन करावे लागते.
पेटीएम पर १०० ,२०० रुपये प्राप्त हुए , हा असा आवाज आला कि दुकानदार निश्चित...
आपले गुरु चंदन कांबळे यांना भेटण्यासाठी घरातून पळून यावे लागले. पुण्यात कात्रजच्या एका हॉटेलात काम...
देशाचे दुसरे पंतप्रधान आणि ‘जय जवान जय किसान’ चा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांचा...
पाब्लो एस्कोबार हा काय साधा सुदा गुन्हेगार नाही. अख्या अमेरिकेला याने नशेला लावलं होतं. एकूण...
२३ वर्षाचा होता तेंव्हा आईला म्हणाला ,”आई मी सगळे लोक विकत घेऊ शकतील अशी जनता...
रस्त्यावरून एखादी बुलेट गेली कि आज देखील सगळे लोक तिच्याकडे इच्छा असो कि नसो तरी...
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे मोदींना रस्त्यातूनच परतावे लागले. नेमकी काय झाली होती पंतप्रधानांच्या सुरक्षितेत चूक ? जर...
सुरक्षितेच्या कारणाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची पंजाबच्या फिरोझपूर मध्ये होणारी सभा रद्द करावी लागली. पंजाबच्या काँग्रेस...