MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

पुणे नंतर मुंबईमध्ये ऍक्टिव्ह रुग्ण संख्या घटली.

पुणे नंतर मुंबईमध्ये ऍक्टिव्ह रुग्ण संख्या घटली.

मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनं सगळ्यांची चिंता वाढली आहे. मुंबईच्या कोरोना केसेस मध्ये मागच्या तीन आठवड्यातील सर्वात मोठी घट झाल्याची बातमी आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या २४ तासातील आकडेवारीनं मुंबईकरांना काहीसा दिलासा दिला आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. २४ तासात मुंबईत ५ हजार ८८८ रुग्ण आढळले आहेत तर तब्बल ८ हजार ५४९ रुग्ण बरे कोरोनामुक्त झाले आहेत. ७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या १२ हजार ७१९ झाली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्के एवढे आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 54 दिवसांवर गेला आहे. तर १७ एप्रिल ते २३ एप्रिल या काळात रुग्णवाढीचा दर १.२६ टक्के एवढा आहे.

पुण्यातही बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त

पुणे मनपा हद्दीत सलग सहाव्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक असल्याने सक्रिय रुग्णसंख्या घटली आहे. शिवाय शनिवार २४ एप्रिल रात्री शेवटचीआकडेवारीनुसार सध्या उपचार सुरु असलेले ५०३२५ रुग्ण पुण्यात आहेत. त्यापैकी नवीन रुग्ण ३९१९ आहेत. बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णाची ४७८९ आहे, म्हणजेच नवीन रुग्णाच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णाची संख्या जास्त आहे.

एकूण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर शनिवारी रात्री पर्यंत नवीन रुग्णाची संख्या ६७१६० होती, तर ६३८१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर मृत्यू ६७६ झाले आहेत. हि रुग्ण संख्या पुढच्या काही दिवसात अजून खाली येईल अशी अपेक्षा करू. रुग्ण वाढीचा आलेख एकदा खाली गेला कि दुसरी लाट लवकर संपेलच. पण तोपर्यंत,

अजून लढाई मोठी आहे एवढ्यात हलगर्जी करू नका. काळजी घ्या. सुरक्षित रहा !

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.