२ एप्रिल गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी मुंबईच्या शिवतीर्थावर जाहीर सभा घेतली. नेहमी प्रमाणे त्यांची सभा गाजली. कोरोना नंतरची त्यांची पहिलीच जाहीर सभा होती. राज्यभरातून राज यांचे कार्यकर्ते मुंबईत आले होते. त्या सभेत राज अनके मुद्दे उपस्थित केले पण सगळ्यात जास्त मीडिया फुटेज मिळालं ते ‘अजान- हनुमान चालीसा’ मुद्द्याला. राज ठाकरे सभेत म्हणाले , “मुसलमानांनी जर अजाणचे भोंगे काढले नाही तर त्याच्या समोर हनुमान चालीसा लावा.”
या मुद्द्यावरून राज यांच्यावर प्रचंड टीका झाली. या सर्व टीकांना उत्तर देण्यासाठी १२ एप्रिलला दहा दिवसांच्या अंतराने राज ठाण्यात उत्तर सभा घेत आहेत. राष्ट्रवादी , काँग्रेस आणि शिवसेनेचा ते समाचार घेतील अशी शक्यता आहे. पण सर्वात जास्त उत्सुकता आहे कि ठाण्याचा सभेत राज ठाकरे भाजप सोबतच्या युतीची घोषणा करू शकतात. राजकीय वर्तुळात तश्या चर्चा चालू आहेत. मनसे-भाजप एकत्र येऊ शकतात याची अनेक कारणे आहेत. त्याचाच आपण आढावा घेऊ.
नितीन गडकरी यांची राज ठाकरेंच्या घरी भेट
शिवतीर्थावर झालेल्या सभेच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज ठाकरेंच्या यांच्या मुंबईच्या घरी दिसले. राज आणि नितीन गडकरी यांना त्यांच्या टेरेस वर चित्रित करण्यात आले. राज आणि नितीन यांचे फोटो वायरल झाल्यावर भाजप आणि मनसे यांच्यातल्या युतीच्या चर्चा सुरु झाल्या. पण मनसे कडून हि घरगुती भेट असल्याचं सांगण्यात आली. नितीन गडकरी आणि राज यांचे संबंध चांगले असल्याचे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. पण ह्या वेळेस नितीन गडकरी यांची टाईमिंग बरोबर साधलं असल्याचं राजकीय जाणकार सांगत आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा संदेश घेऊन नितीन गडकरी राज ठाकरे यांच्या कडे आले असल्याचं सांगण्यात येत आहे. जर या बातम्या खऱ्या असतील तर लवकरच भाजप मनसे यांच्या युतीची घोषणा होऊ शकते.
महापालिकेच्या निवडणुकांसाठी राज ठाकरेंना भाजपाची गरज लागणार आहे
जून, जुलै मध्ये राज्यात महापालिकेच्या निवडणूक लागणार आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपाची सरळ सरळ टक्कर आहे. पण ह्या निवडणुकीत राज ठाकरे त्यांच्या मनसेला संधी शोधत आहेत. राज यांच्या पक्षाची ताकद महाराष्ट्रात उरली नाही. मुंबईत एक आमदार आणि पुण्या मुंबईत थोडे फार नगरसेवक मनसेकडे आहेत. येवढया ताकतीवर निवडणुका जिंकणं शक्य नाही याची जाणीव राज ठाकरेना आहे. त्यामुळेच ते भाजपाकडे युती करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोललं जात आहे.
विधानसभेच्या नंतर भाजपाची साथीदार शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत गेल्यामुळे भाजपाला देखील शिवसेने सारखा पक्ष हवाय. मनसे भाजपासाठी एकदम बरोबर आहे. मुंबईत तर विना शिवसेना लढणं भाजपासाठी अवघड जाणार आहे पण राज जर भाजप सोबत आले तर मात्र लढाई सोपी जाईल. त्यामुळेच भाजपचे नेते राज ठाकरे याना युती साठी प्राथमिक प्रतिसाद देताना दिसत आहेत.
भाजपच्या मजबुरीची जाण राज ठाकरेंना आहे. त्यामुळे त्यांनी आज पर्यंत भाजप सोबत जाणार कधी बोलून दाखवलं नाही पण अनेक भाजप नेते राज ठाकरे यांना युतीत घेण्यासाठी आतुर आहेत. राज ठाकरे यांच्या डोक्यात काय प्लॅन आहे हे येत्या काळात महारष्ट्राला समजेलच.
रावसाहेब दानवे यांच्या भेटी नंतर युती डन ?
नितीन गडकरी यांनी भेट घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे राज यांच्या भेटीला कृष्णकुंजवर पोहचले. रावसाहेब दानवे यांची भेट यासाठी महत्वाची आहे कारण नितीन गडकरी त्यांच्या आधी राज याना भेटले आणि दुसरे म्हणजे रावसाहेब यांनी भाजप- मनसे युतीची शक्यता बोलून दाखवली होती. गुडीपाडव्याच्या सभेवर प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले होते कि, “राज ठाकरे यांनी परप्रांतीयांचा मुद्दा बाजूला ठेवला तर त्यांच्या सोबत युती होऊ शकते. “
राज ठाकरे आणि रावसाहेब यांच्या भेटीवरून राजकीय विश्वात चर्चा चालू आहेत कि, नितीन यांनी राज ठाकरेंचा निरोप मोदींना पोहचवला आहे आणि आता मोदींचा निरोप घेऊन रावसाहेब राज यांच्या कडे आले होते. रावसाहेब एवढ्या लवकर राज ठाकरे यांच्या भेटीला आले म्हणजे भाजप राज यांच्या सोबत युती करायला तयार असल्याचे लक्ष्यात येतं अशी अंदाज काढली जात आहेत. भाजपकडून डन झाल्यामुळे उद्याच्या ठाण्याच्या सभेत राज ठाकरे भाजप सोबतच्या युती घोषणा करू शकतात अश्या चर्चा देखील रंगल्या आहेत.
राज ठाकरे याच्या सभेची सर्वाना उत्सुकता लागली आहे. विरोधकांना ते कसे उत्तरे देतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे कारण राज यांच्या भूमिकेनंतर महाराष्ट्राचे राजकारण फिरणार आहे. राज ठाकरे जर भाजप सोबत गेले तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि भाजप -मनसे अशी लढत होईल आणि जर राज यांनी भाजप सोबत युती नाही केली तर महाराष्ट्रात तिरंगी लढत होऊ शकते.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !