आपल्या देशात सगळ्यात जास्त कोण जेल मध्ये जात असेल तर ते आहे चंद्रशेखर आझाद रावण .सरकार कोणाची पण असो कुठलीही असो आझाद बाहेर निघाला कि बरोबर पोलीस त्याला अटक करतात.
उत्तर प्रदेश मध्ये निवडणुकीचा धुराळा चालू आहे.१० फेबुरवारी पासून मतदान होईल. भाजप ,समाजवादी पक्ष,काँग्रेस सगळे आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. गोरखपूरमधून भाजपने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथची उमेदवारी जाहीर केली आहे. गोरखपूरची जागा योगी आदित्यनाथसाठी खूप सोपी असल्याचं बोललं जात आहे. पण चंद्रशेखर अझादने स्वतःची उमेदवारी गोरखपूरमधून जाहीर केल्याने रंजक वाढणार आहे.
चंद्रशेखर आझाद आणि भीम आर्मीचा इतिहास.
वडील शाळेत शिक्षक त्यामुळे घरी लहानपणापासूनच शिक्षणाचे वातावरण होते. चंद्रशेखर आझाद लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. बारावी पर्यत शिक्षण केल्यावर अझादने कायद्याचे शिक्षण घेतले. जन्माने दलित असल्यामुळे आझादला जातीच्या भेदभावाला सामोरे जावे लागले. कायद्यांचे शिक्षण घेतल्यामुळे हे अन्याय संपवण्यासाठी आपल्यलालाच पुढाकार घ्यावा लागेल हे त्याच्या लक्षात आले. त्यांच्या डोक्यात आले आपण एक स्वाभिमानाची दलित चळवळ चालू करायची. मित्रांना सोबत घेऊन भीम आर्मी सुरु केली. तरुणांची चळवळ म्हणून भीम आर्मीला देशभर मान्यता मिळत आहे.
देशात कुठेही दलित अत्याचार होऊ देत ‘रावण’ सगळ्यात आधी पोहचतो.
चंद्रशेखर आझाद रावण ३५ वर्षाचा आहे. त्यामुळे तरुण त्याच्या कडे आकर्षित होतात. त्याचा उत्साह नेहमी बघण्याजोगा असतो. अन्याय होत असेल तर त्यासाठी कितीही संघर्ष करावा लागत असेल तर तो तयार असतो. दलित अत्याचाराच्या झाली असेल तर आझाद सगळ्या यंत्रणांना चुकवून घटना स्थळीं पोहचतो. अन्यायग्रस्तांना सांत्वना देतो. पोलिसांनी अन्याय ग्रस्तांना लवकर न्याय द्यावा म्हणून तो स्वतः लक्ष देतो. त्याच्या ह्याच कामामुळे संपूर्ण उत्तरप्रदेशात त्याची भीम आर्मी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हाथरास घटना झाली तेंव्हा पण रावण अन्यायग्रस्त परिवाराला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. आणि देशात पण जर दलितांवर अन्याय अत्याचार होत असेल तर तो कशाचीही पर्वा न करता पीडित परिवाराची भेट जातो जातो.
भाजपचं सरकार जाण खूप गरजेचं आहे असं ‘रावण’ सांगतो.
देशात भाजपचे सरकार आल्यापासून दलितांविरोधात अत्याचार वाढले असल्याचे चंद्रशेखर सांगतो. मोदी आणि योगी आदित्यनाथ हे दोघे पण दलित विरोधी आहेत. संविधान न मानणारे नेते आहेत. दलित आणि अल्पसंख्याक भाजप सरकारच्या काळात भीती मध्ये आहेत. त्यामुळे भाजप सरकार जाणे खूप गरजेचे आहे तो म्हणतो.
भीम आर्मी २०२१ ची निवडणूक स्वबळावर लढतेय .
सुरुवातीला समाजवादी पक्षाशी भीम आर्मी युती करू शकते अश्या बातम्या येत होत्या. पण आम्ही कोणाशी ही युती करणार नसल्याचे चंद्रशेखर आझादने जाहीर केले आहे. एकूण जागांपैकी २०० जागेवर भीम आर्मी त्यांचे उमेदवार देणार आहे. त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. स्वतः चंद्रशेखर आझाद रावण योगी आदित्यनाथच्या विरोधात गोरखपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढणार आहे. भीम आर्मी कडून तशी घोषणा केली आहे. गोरखपूर मधून उमेदवारीची घोषणा करून चंद्रशेखर आझादने राज्यभर एक संदेश दिला आहे कि रावण भाजप आणि योगींच्या विरोधात लढायला तयार आहे. पण चंद्रशेखर आझाद रावण गोरखपूर मधून जिंकेल का बघणे महत्वाचे ठरणार आहे.
हे खास आपल्यासाठी
महिला आणि पुरुषांमध्ये जननेंद्रियाचा क्षयरोग – जाणून घ्या याबद्दल सर्व काही
ऑटो रिक्शा चालकांमध्ये टीबी चे प्रमाण
पोट दुखतय ? टीबी तर ना , होय असू शकतो टीबी.. काय आहेत लक्षणे वाचा.