अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरीना कैफ लग्न करणार असल्याचा बातम्या येत आहेत. बॉलिवूड मध्ये एक दशकांपेक्षा ज्यास्त काळ कतरीना कैफ काम करते आहे. वेलकम, एक था टायगर सारखे सुपरहिट चित्रपट कतरीना कैफ ने केले आहेत. विकी कौशल मात्र बॉलिवूड मध्ये २०१५ पासून आला आहे. विकी कौशलने पण ‘उरी’ सारखे सुपर हिट चित्रपट दिले आहेत. लोक मात्र विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या बातमीवर वेग वेगळे व्यक्त होत आहेत. अभिषेक बच्चन सोबत विकी कौशलची तुलना करत आहेत.
अभिषेक बच्चनच्या लग्नाच्या चर्चा परत का होत आहेत ?
‘रिफुजी’ चित्रपटातून अभिषेक बच्चनने आपले बॉलिवूड पदार्पण केले. अभिताभ बच्चन यांचा मुलगा असल्यामुळे अभिषेक बच्चन याची तुलना लोक वडील अभिताभ यांच्याशी करायचे. अभिषेक बच्चनच्या अभिनय त्याच्या वडीलांसारखा नाही म्हणून लोक अभिषेक वर टीका करतात.
२००७ साली अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी लग्न केले. त्या वेळी ऐश्वर्याने चित्रपट श्रुष्टी मध्ये प्रचंड यश मिळवलं होत. देवदास, मोहब्बते सारखे सुपर हिट चित्रपट दिले होते. त्या विपरीत अभिषेक आणखी सुपर हिट चित्रपट देणारा नातं नव्हता. चाहत्यांच्या नजरेत ऐश्वर्या एक यशस्वी नटी होती तर अभिषेक मात्र फार यशस्वी नसल्यामुळे चाहते अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाचे जोक करत असत.
सलमान खानचा दुआ
अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रॉय सोबत लग्न करण्याअगोदर ऐश्वर्या आणि सलमान हे दोघे रिलेशनशिप मध्ये होते. ते दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्या येत असत. नंतर त्यांचे आपसात भांडण झाले आणि ऐश्वर्या ने अभिषेक सोबत लग्न केले.
विकी कौशल आणि कतरीना हे दोघे आता लग्न करत आहेत मात्र कतरिनाचे पण नाव सलमान खान सोबत जोडले जात होते. सलमान खान आणि कतरीना दोघे लग्न करू शकतात अश्या बातम्या येत होत्या. अभिषेक आणि विकी कौशल यांच्यात सलमान खान एक सामान दुआ होत असल्यामुळे पण विकी कौशलची अभिषेक सोबत तुलना केली जातेय.
विकी कौशलची अभिषेक बच्चनशी तुलना करणं योग्य आहे का ?
कतरीना आणि विकीच्या लग्नाच्या बातम्या आल्यापासून मिमर मिम बनवत आहेत. पण विकी कौशल आणि कतरीना हे अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या पेक्षा वेगळे आहेत. लग्न होण्याअगोदर अभिषेक ने त्याचे अभिनय कौशल्य सिद्ध केले नव्हते त्या विपरीत विकी कौशल ने मात्र आज उरी, मसान आणि सरदार उधम सिंग नंतर बॉलिवूड मध्ये एक प्रसिद्ध अभिनेता झाला आहे. कतरीना पेक्षा विकी बॉलिवूडमध्ये नक्कीच नवा आहे मात्र विकी ने अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. विकी आज बॉलिवूड स्टार झाला आहे. अभिषेक -ऐश्वर्या असो किंवा विकी कौशल-कतरीना असो चाहत्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल टीका केली नाही पाहिजे. मात्र सोशल मीडिया वरचे ट्रोल नेहमी अभिनेते आणि अभिनेत्रींच्या वैयक्तिक आयुष्यावर मिम करत असतात.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !