तेलंगणाचे उद्योग मंत्री केटीआर यांनी एलोन मस्कला ट्विटर वरून तेलंगणामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. मग महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील यांनी देखील महाराष्ट्राचे आमंत्रण दिलॆ आणि ही रांग वाढतच गेली. पश्चिम बंगाल, पंजबाच्या मंत्र्यांनी देखील त्यांच्या राज्यांसाठी निमंत्रण दिले. केंद्र सरकार हिरवा कंदील देत नसताना राज्य एलोन मस्कला बोलवत आहेत तेंव्हा हे प्रकरण समजून घेतले पाहिजे.
एलोन मस्कला आमंत्रणाची सुरुवात कशी झाली ?
प्रणय नावाच्या एका भारतीयाने ट्विटरवर एलोन मस्कला टॅग करून एक ट्विट केले.
प्रणयला उत्तरं देताना एलोन मस्कने एक ट्विट केले त्यात तो म्हणतो कि
प्रणय मी भारतात येण्यास तयार आहे पण तुमचं सरकार सहकार्य करत नाहीये. ह्या दोन ट्विट पासूनच सुरु झाला हा सगळा आमंत्रण प्रवास.
केटीआरने मस्कचे ट्विट वाचून त्याला उत्तर दिले.
हे मस्क मी तेलंगणा राज्याचा उद्योग मंत्री आहे. आमच्या राज्यामध्ये उद्योगासाठी योग्य सुविधा आहेत. त्यामुळे तू तुझी टेस्ला कंपनी तेलंगणामध्ये स्थापन करू शकतोस. आम्ही सरकार म्हणून तुला सर्व सहकार्य करायला तयार आहोत.
मोदी सरकारचे अन एलोन मस्कचे काय भाडंण आहे का ?
धंद्यात भांडण नसतात असतो फक्त फायदा. त्यामुळे कुठलाच धंद्यावाला कोणासोबत भांडण करत नाही. सरकार सोबत तर नाहीच नाही. एलोन मस्कचे सरकार सोबत भांडण नाही फक्त भारत सरकार काही अटी लावत आहे अन त्याला त्या परवडत नाहीत. टेस्ला नावाची मस्कची कंपनी इलेक्ट्रिक कार बनवते. टेस्ला जगातली सगळ्यात भारी कार आहे असं सगळे म्हणतात. पण एलोन मस्कने आशिया मध्ये अगोदरच कंपनी सुरु केली आहे चीनच्या बीजिंगमध्ये. आपले आणि चीन सोबत कसे संबंध आहे हे सांगायला नको. त्यामुळे भारतात जर टेस्ला विकायची असेल तर ती भारतातच बनवावी लागेल असे आदेश मोदी सरकारने दिले आहेत. म्हणजे ह्यात गैर देखील काही नाही. पण चीन मधील कंपनी सगळ्या आशिया खंडात पुरवेल एवढ्या कार बनवते मग नवीन कंपनी सुरु करायची गरज नाही. मस्कला कंपनीला तसे परवडणार देखील नाही. त्यामुळे एलोन मस्कला एक तर भारतात कंपनी सुरु करावी लागेल किंवा भारतीय बाजारात कार विकता येणार नाही.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !