Gehraiyaan movie review in marathi
आलिशा ही जैनला भेटून सांगते मी करणला सोडले आहे. जैनला वाटायला लागते हिने माझ्यासाठी त्याला सोडलं. तेव्हा अलिशा स्पष्ट शब्दात सांगते मी तुझ्यासाठी नाहीतर स्वतःसाठी त्याला सोडलंय. हा संवाद समजून घेतला तर खूप मोठा खोलवर अर्थ सापडेल. आपण प्रत्येक निर्णय दुसऱ्यांसाठी घेतो. आयुष्यात कोणी तरी आलंय म्हणून कोणाला तरी सोडायचं हे आपलं साधं गणित आयुष्यभर अशा गोष्टीत भटकवायला लावतं जे आपल्यासाठी महत्वाचं नव्हतं.
चित्रपटाची अडचण अशी आहे कि यातील पात्रे सर्वसामान्य घरातील वाटत नाहीत. त्यामुळे असे चित्रपट एक विशिष्ट वर्गापुरते आहेत असं वाटतं पण दरवेळेस म्हणून असे विषय नाकारणे बरोबर नाही. दीपिकाने साकारलेली आलिशा ही सर्वसामान्य कुटुंबात सुद्धा वावरत असते. आलिशा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर चित्रपट खूप काही सांगून जातोय हे कळेल. चित्रपटातील संवाद खूप छोटे आहेत पण परिस्थिती मांडणारे आहेत. काही संवाद आयुष्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. हा चित्रपट संथ गतीने पुढे जातो त्यामुळे खूप जणांना आवडणार नाही. पण अशा चित्रपटाची सवय पाहिजे कारण असे चित्रपट फक्त बोलण्यातून पुढे जात नसतात तर घटनांचा अर्थ शोधत पुढे जावं लागतं.
Gehraiyaan हा चित्रपट नात्यांची गुंतागुंत सोडवणारा नाही तर गुंतागुंतीचे वास्तव दाखवणारा आहे. यामुळे आपण चुकीच्या धारणा आयुष्यभर घेऊन बसतो आणि आणि येणाऱ्या आयुष्यावर त्याचा परिणाम करतो. अलिशाच्या लहानपणीच्या एका घटनेचा तिच्या आयुष्यावर खूप परिणाम झाला आहे. यामुळे ती वडिलांना आयुष्यभर दोषी मानत आहे. सहा वर्षांपासून प्रेमात आहे म्हणजे प्रेम यशस्वी आहे किंवा आनंदी आनंद आहे असं अजिबात नाही. ठराविक वेळेनंतर नात्यांना पुन्हा तपासून घ्यावं लागेल. आलिशा या सगळ्या प्रश्नांवर उत्तर शोधत असताना कोणत्या टप्यावर येऊन थांबते यासाठी पिक्चर बघावा लागेल.
चुलत बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर अलिशा संबंध ठेवते. एवढ्या सोप्या पद्धतीने चित्रपट बघू नका. आज आपल्या आसपास अशी कित्येक उदाहरणे सापडतील जिथे सामाजिक दबाव आहे म्हणून नाती टिकलेली दिसतात. अशा नात्यांना कुरवाळत बसून काय साध्य होणार हे विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे. दीपिकाच्या नजरेतून चित्रपट समाजाची दुसरी बाजू मांडतॊय. दीपिकाने साकारलेली आलिशा समजून घ्यायचा प्रयत्न करणार असाल तर चित्रपट काही तरी नवीन देईल नाहीतर नुसती लफडी चालू आहेत असं वाटेल.
चित्रपटाची पटकथा वास्तव आहे म्हणून भडक संवाद किंवा मसाला चित्रपटासारखी मांडणी अजिबात नाही. ही कथा चित्रपटाच्या नावाला अर्थ देणारी आहे. दिग्दर्शकाने या अगोदर कपूर अँड सन्स चित्रपटात अशाच पद्धतीची मांडणी करून नात्यांचा वेगळा अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला होता. शकुन बत्रा हा दिग्दर्शक असे विषय नेहमीच घेऊन येतो. त्याच्या सगळ्या चित्रपटात उच्च मध्यम वर्गीय कथाच असतात. पण कोणतीही कथा कोरड्या पद्धतीने तो मांडत नाही. या चित्रपटाला देखील त्याने तसाच न्याय दिला आहे. दीपिकासाठी तर एकदा Gehraiyaan नक्की बघा.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !